BIG BREAKING NEWS # एकनाथराव खडसेंसाठी आज राजकीय अस्तित्वाची लढाई

विधानपरिषदेच्या निवडणूकीकडे जिल्ह्यात रंगतेय गॉसीप
BIG BREAKING NEWS # एकनाथराव खडसेंसाठी आज राजकीय अस्तित्वाची लढाई
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी उद्या दि. 20 रोजी निवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकनाथराव खडसे (NCP's Eknathrao Khadse) यांना उमेदवारी (Candidacy) देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे खडसे यांचा विधीमंडळातील प्रवेश रोखण्यासाठी (prevent entry into the legislature) भाजपा (BJP) जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक हि एकनाथराव खडसेंसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई (battle for political existence) ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी जळगाव जिल्ह्यात राजकीय गॉसीप चांगलेच रंगत आहे. राज्यसभा निवडणूकीत भाजपाने महाविकास आघाडीला ‘दे धक्का’ दिल्याने आघाडीकडून सावध पावित्रा घेण्यात आला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेंना संधी मिळेल अशी आशा होती. मात्र ती यादीच रद्द झाली आणि रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीने एकनाथराव खडसेंना उमेदवारी जाहीर केली. गेल्या सहा वषार्र्पासून एकनाथराव खडसे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. पक्ष संघटनेच्या किंवा कुठल्याही संवैधानिक पदावर नसल्याने खडसे समर्थकांना या उमेदवारीपासून मोठी आशा लागून आहे.

खडसेंचे राजकारण संपले असे अनेकांना वाटत असले तरी विधानपरिषदेच्या या उमेदवारीने भाजपाचे कट्टर विरोधक म्हणून पुन्हा एकदा ते विधीमंडळात दिसतील अशी व्युहरचना राष्ट्रवादीने आखली आहे. तर दुसरीकडे भाजपानेही हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विधानपरिषदेसाठी मतांचा कोटा आणि गुप्त मतदान लक्षात घेता खडसेंसाठी हि निवडणूक सोपी नाही.

मात्र अनेकांना राजकारणाचे धडे देणार्‍या खडसेंनीही आपले राजकीय आणि वैयक्तीक संबंध उपयोगात आणून मतदानाचे आवाहन केले आहे. ‘अभी नही तो कभी नही’ अशीच ही निवडणूक असून खडसेंसाठी ती मात्र राजकीय अस्त्विाची लढाई ठरणारी आहे.

खडसे समर्थक मुंबईकडे रवाना

एकनाथराव खडसे यांना समर्थन देण्याकरीता जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आज सायंकाळी रवाना झाले आहेत. यात भुसावळसह मुक्ताईनगर, रावेर, यावल यासह इतर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईला गेले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल मतदान झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे. त्यासाठीच सर्व कार्यकर्ते खडसेंच्या समर्थनासाठी रवाना झाले आहे.

मुक्ताईचा आशिर्वाद पाठीशी-खडसे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांशी संपर्क साधत आहोत. गेल्या चाळीस वर्षांपासून राज्याच्या राजकारणात अनेकांशी वैयक्तिक स्वरुपाचेही संबंध आहेत. राष्ट्रवादीत असलोतरी भाजपातही अनेक समर्थक आहेत. परंतू शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुक गांर्भियाने घ्यावी लागते. श्री संत मुक्ताईचा आशिर्वाद पाठीशी असल्याने काळजी नसल्याचे एकनाथराव यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

एकनाथराव खडसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com