महिलांसह आदिवासींचे प्रश्न सोडविणार

समृद्ध महिला संकल्प परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आश्वासन
महिलांसह आदिवासींचे प्रश्न सोडविणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पर्यावरणाच्या (environment) द़ृष्टीकोनातून जल,जंगल,जमीन यांचे संरक्षण आणि संवर्धन महत्वाचे आहे. आदिवासींचे अनेक प्रश्न (Many tribal questions) आहेत. आदिवासीच्या विविध समस्या लोकसंघर्ष मोर्चाच्या (Lok Sangharsh Morcha) प्रतिभा शिंदे यांनी मांडल्या असून त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येण्यात येईल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा (Discussion with the Chief Minister) करुन आदिवासींचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खा.शरद पवार (Assurance of NCP President Sharad Pawar) यांनी दिली. लोकसंघर्ष मोर्चातर्फे शुक्रवारी जी.एस.ग्राऊंडवर समृद्ध महिला संकल्प परिषदेच्या (Samriddha Mahila Sankalp Parishad) आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

या परिषदेच्या व्यासपीठाला शहीद सीताबाई तडवी विचार मंच नाव देण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, आदिवासी व ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आ.अनिल पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.लताताई सोनवणे, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव पाटील, आ.सुधीर तांबे, महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादी काँगे्रस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,आमजी आ.विद्या चव्हाण, अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आ.मनीष जैन, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे, संजय पवार, सचिन धांडे, भरत कर्डिले यांच्यासह आदिवासी समाजातील प्रमुख पदाधिकारी विचारमंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपरिक नांगर पूजा (Plow worship) कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली. खा. शरद पवार यांनी नांगरावर धान्याची मूठ धरुन पेरणी (Sowing) केली. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पारंपरिक ढोल वाजून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत आदिवासी पारंपरिक पद्धतीने केले.

रणरण्या उन्हात आदिवासी महिलांसह नागरिक या महिला समृद्ध परिषदेला 10 हजारापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहिल्या. शेतकरी महिलांच्या मदतीने सातपुडा पुन्हा हराभरा करु. त्यासाठी वनहक्काची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मत लोकसंघर्षमोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे (National President Pratibha Shinde) यांनी व्यक्त केले. त्यानंतर हिराबाई वसावे यांच्यासह दोन महिलांनी पावरी भाषेत आदिवसांचे गीत गावून त्यांचे प्रश्न मांडले.

यावेळी सहा ठराव पारित (Resolution passed) करण्यात आले. प्रतिभा शिंदे या आदिवासींचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असून आदिवासी शेतकरी महिलांसाठी भर उन्हात सभा घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी झटत आहे, असे विचार माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी मांडले. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,कृषीमंत्री दादा भुसे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले. आभार भरत कर्डिले यांनी मानले.

परिषदेत मंजूर झालेले ठराव मिशन वात्सल्स सिंधू योजनासह आदिवसांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, शेतीचा विकास व्हावा, आदिवासी समृद्ध व्हावा, अर्थव्यवस्थेची सांगड घालण्यासाठी शेती शिवाय पर्याय नाही. त्यासाठी आदिवासींना जलसंधारण विभाग ग्रामसमृद्ध योजना राबवून वातावरण पुरक करावे, असंघटीत महिलांसाठी विविध योजना राबवून स्वातंत्र्य प्राधिकरण करावे, आदिवासींचा संघर्ष मोठा आहे त्याचबरोबर महिलाही शेती उपयोगी कामे करीत असल्याने त्यांच्या नावावर शेती जमिनिंचा उतारा देण्यात यावा, आदिवासींवरील अन्याय दूर करावा. यासह विविध सहा ठराव मांडण् यात आले.

योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील-ना तनपुरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आदिवासींचे प्रश्न (Tribal issues) समजावून घेत आहे. त्यांच्या भागात जावून त्यांचे प्रश्न समजून धोरण बनविण्याचे काम सुरु आहे. आदिवासींच्या प्रश्नांसह वनहक्क दावे (Forest rights claims) आणि हक्काच्या जमिनीवर सातबारा उतारा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यावल प्रकल्पासह आदिवासींसाठी असलेल्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आदिवासी व ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे (Tribal and Energy Minister Prajakta Tanpure) यांनी दिली.

महागाईने सर्वसामान्य जनता होरपळतेय

आदिवासींना सन्मानाने जगता यावे, यासाठी अनेक प्रश्न उभे राहिले. मात्र, महागाईवर (inflation) कोणीच बोलायला तयार नाही. दिवसेंदिवस पेट्रोल,डिझेल,गॅसच्या किंमती वाढल्यामुळे जनता (Public) महागाईन होरपळून भरडली जात आहे. मोदी साहेबांच्या राजवटीत आदिवासींना मोफत गॅसमुळे लाकूड वाचेल. मात्र,1 हजाराच्यावर गॅसची किंमत (price of gas) गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना कसे परवडेल, असा प्रश्न जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील (Minister of Water Resources Jayant Patil) यांनी उपस्थित करुन केंद्रावर टीका केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com