सोशल मीडियाच्या माध्यमातून आ.चिमणराव पाटील म्हणाले की...

तुंबड्या भरण्यासाठी बंड नाही
आमदार चिमणराव पाटील
आमदार चिमणराव पाटील

जळगाव । jalgaon

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बंड (rebels on the issue of Hindutva) केले असून विचारसारणीला तिलांजली देत सत्तेवर येत तुंबड्या भरण्यासाठी केलेले हे बंड नाही. आणि त्याच भूमिकेला समर्थन (Role support) देत आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे प्रतिपादन एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील (Erandol MLA Chimanrao Patil) यांनी फेसबूकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद (Communicate with activists through Facebook) साधताना केले

.त्यावेळी मी गेल्या सहा निवडणुका राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो.आता त्यांच्यासोबत सत्तेत असतांना आगामी निवडणुकीत आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे,भारतीय जनता पार्टी आमची नैसर्गिक मित्र आहेत.त्यांची व आमची युती सत्तेसाठी नव्हे विचारांच्या आधारावर होती.मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने अनेक आमदारांमध्ये नाराजी होती.त्यांना एकनाथ शिंदेंनी साथ दिली.आम्ही आजही शिवसेनेतच असून शिंदे साहेबांसोबत आहोत असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com