टॉवर चौकात पहाटे भरधाव डंपरचा थरार

टॉवर चौकात पहाटे भरधाव डंपरचा थरार

कारमधील शिक्षक गंभीर जखमी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरात रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक (Illegal sand transport) करणारे ट्रॅक्टर व डंपर सुसाट धावत असतात. याचाच प्रत्यय शुक्रवारी भल्या पहाटे सव्वा सहा वाजता टॉवर चौकात मद्यधुंद डंपरचालकानेे (Dumper) चारचाकीला (Dumper) जोरदार धडक (hit hard) दिली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी (seriously injured) झाले आहे. कारमधील जखमींना नागरिकांनी काढून तत्काळ रुग्णालयात उचारासाठी दाखल केले. तर कारला धडक देवून डंपरचालक डंपर काही अंतरावर थांबवून पसार झाला.

जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवारी 24 मार्च रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच 19 बीजे 7917) ही नेहरू पुतळाकडून टॉवर चौकात येत होती. त्याच वेळी आव्हाने मार्गे, शिवाजी नगरकडून चित्रा चौकामार्गे भरधाव जाणारा डंपर (एमएच 19 झेड 4100) ने टॉवर चौकात कारच्या डाव्याबाजूने जोरदार धडक दिली.

या धडकेत कारमध्ये बसलेले शिक्षिका सविता अशोक सानेवणे (वय-40) रा. रामानंद नगर, जळगाव आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (वय-42) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. तर या घटनेत चारचाकीचा चुराडा झाला असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान डंपर चालकांनी शहरात धुमाकूळ घातला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

डंपर सोडून चालक पसार

डंपरचालकाने घटनास्थळावर काही अंतरावर डंपर सोडून पसार झाला. यावेळी शहर पोलीसांनी कार व डंपर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

मदतीसाठी पोलीस, नागरिकांची धाव

पहाटेच्या शांततेत डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज झाला. जवळच असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, तसेच फिरणारे व कामानिमित्त जाणारे नागरिकांनी तत्काळ कारमधील जखमींना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तिघांना कारमधून काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com