जामठी जवळ महिंद्रा पिकअप उलटून वैजापूरचे तीन तरुण ठार

जामठी जवळ महिंद्रा पिकअप उलटून वैजापूरचे तीन  तरुण ठार

चोपडा chopda प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर (Maharashtra and Madhya Pradesh) असलेल्या वैजापूर (Vaijapur) पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले जामठी (Jamthi) गावाजवळ रस्त्यावरील गंभीर वळणावर महिंद्रा पिकअप (Mahindra pickup) गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने (Loss of driver control) पिकअप उलटून (overturned) झालेल्या गंभीर अपघातात गाडीत बसलेले १३ तरुणांपैकी तीन जागीच (Three youths)ठार (killed) झाले तर १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

अपघातातील मयत तरूण
अपघातातील मयत तरूण

त्यात दोघा तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांचेवर उपचार सुरू आहेत.तर उर्वरित गंभीर जखमींवर चोपडा येथील खाजगी हॉस्पिटलला उपचार सुरू आहेत. अपघातात मयत झालेले तिघे आदिवासी तरुण व सर्व जखमी वैजापूर येथील आहेत.अपघाताची वार्ता कळताच वैजापूर (ता. चोपडा) गावातील सर्वांनी प्रचंड आक्रोश केला.

वैजापूर (ता.चोपडा) येथील बारा आदिवासी तरुण व चालक असे तेरा जण महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक-MH19 8348 यात बसून मध्यप्रदेशातील आंबा अवतार गावात कबड्डी स्पर्धा बघण्यासाठी दि.२९ ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जात असतांना वैजापूर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठी गावाजवळ महिंद्रा पिकअपचा चालक सुरेश ओंकार बारेला याचे रस्त्याच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडीने घटनास्थळावर तीन ते चार वेळा पलटी मारली.

झालेल्या भीषण अपघात गाडीत बसलेले चालकासहीत १३ तरुणांपैकी निलेश शांतीलाल बारेला(२२),जगदीश केरसिंग बारेला(१९), पंकज प्रकाश बारेला(१६) या तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

तर राहुल वैरसिंग बारेला,विवेक संजय बारेला या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.गंभीर जखमी असलेल्या परशुराम जाश्या बारेला,दिलीप वैरसिंग बारेला, राहुल सरदार बारेला,रोहन सरदार बारेला अशा चौघांना चोपड्यातील खाजगी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर शमा राजेंद्र बारेला याला वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात मयत झालेले तिघे आदिवासी तरुण व सर्व गंभीर जखमी वैजापूर येथील रहिवाशी आहेत.

अपघात झाल्यानंतर सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील,डॉ.सागर पाटील,डॉ.पवन पाटील, डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व गंभीर जखमींवर औषधोपचार केला.त्यात दोघा तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १०८ अम्ब्युलन्सने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

तर उर्वरित गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करण्यात येऊन शहरातील खाजगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.तसेच अपघातात मयत झालेल्या तिघा आदिवासी तरुणांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिघांवर वैजापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती डॉ.चंद्रकांत बारेला यांनी दिली.

अपघात प्रकरणी महिंद्रा पिकअप गाडीचा ड्रायव्हर सुरेश ओंकार बारेला यांच्या विरुद्ध पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com