ग्रामसेवकांचे ते प्रमाणपत्र अवैध

धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा त्रिस्तरीय समितीचा निर्वाळा ; त्या प्रमाणपत्रा आधारे नोकरीत मिळवला लाभ
ग्रामसेवकांचे ते प्रमाणपत्र अवैध
USER

रावेर|प्रतिनिधी raver

अपंगत्वाचे खोटे प्रमाणापत्र मिळवून त्याचा लाभ घेतलेल्या रावेर तालुक्यातील ५ ग्रामसेवकांचे ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे असे प्रमाणपत्र मिळवून लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका मानला जात आहे.

तालुक्यातील ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले मिळवून नोकरीत बदली करण्यासाठी व सोयी लाटण्यासाठी त्यांचा वापर केलेले दाखले धुळे शासकीय वैदकीय महाविद्यालयाच्या त्रिस्तरीय समितीने रद्द केले आहे,रद्द करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात नितीन दत्तू महाजन,राहुल रमेश लोखंडे,रवींद्रकुमार काशिनाथ चौधरी,छाया रमेश नेमाडे,शामकुमार नाना पाटील या ग्रामसेवकांचा समावेश आहे.

संबंधित ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी व इतर लाभ घेण्यासाठी या सर्टिफिकेटचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई बाबत पंचायत समितीकडून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठवणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी सोनवणे यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com