पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन -तेरा

कुर्‍हा ते सुरनदीपर्यंतचा रस्ता जैसे थे : निकृष्ठ कामाचा उत्कृष्ठ नमुना: अपघातांची शक्यता
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन -तेरा

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

तालुक्यातील कुर्‍हा ते सुर नदीपर्यंतच्या (Kurha to Sur river) जामनेर रोडची (Jamner Road) दुरावस्था (Bad condition) झाली होती, त्यानंतर मागील तीन-चार महिन्यांपासून या रस्त्याची दुरूस्तीचे काम (Repair work)धिम्या गतीने सुर होते. ते साधारण महिनाभरापूर्वी पूर्ण ही झाले. मात्र नुकत्याच झालेल्या भीज पावसामुळे या रस्त्याची दुरावस्था होऊन तो ‘जैसे थे’ झाल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन-तेरा झाल्याचा अनुभव वाहन धारकांना येत आहे. या रस्त्यावर अपघातांची शक्यता (Possibility of accidents) व्यक्त होत आहे.

तालुक्यातील जामनेर रोडची मार्च महिन्यापासुसन डागडुजी व दुरस्ती करण्यात येत होती. दुरस्ती सुर असतांनाच निकृष्ठ असलेला रस्ता उखडायला सुरवात झाली होती. त्यानंतर मागील आठवड्यात झालेल्या चार दिवसांच्या भीज पावसाने तर या निकृष्ठ रस्त्याचे बिंग उघडे पडले असून. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अजून संपूर्ण पावसाळा घ्यायाचा असल्याने रस्ता अधिक खराब होण्याची शक्यता आहे.

या रस्त्याच्या दुरस्तीचे काम सुरवातीपासूनच निकृष्ठ होत होते. याबाबत तालुक्यातील कुर्‍हा येथील तत्कालीन सरपंच जीवन पाटील यांनी आवाज उठविला होता. त्यान नंतर धिम्या गतीने रस्त्याचे काम साधार तीन-चार महिन्यात पूर्ण करण्यात आले होते. यानंतर वाहनधारकांना दिलासा मिळाला होता.

पहिल्याच पावसात तीन-तेरा

दरम्यान, या रस्त्याचे काम साधारण महिना-सव्वा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची दानादान उडाली आहे.पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचते त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरुन पडल्याच्याही घटना घडल्या आहे. त्यामुळे निकृष्ठ असलेल्या या रस्त्याचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडल्याचे चित्र आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष

रस्ता दुरुस्तीच्या सुरवातीपासून काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप नागरिक व वाहनधारकांमधून होत असतांनाही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सदर ठेकेदाराला पाठिशी घालून प्रवाशी व वाहनधारकांच्या जिवाशी खेळ चालवित निकृष्ठ कामाकडे दुर्लक्ष केले होते. आता रस्ता पूर्ण पणे उखडतांना दिसत आहे. आतातरी संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ या रस्त्याची दुरस्ती करुन घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी हा प्रकार किती गांभीर्याने घेतात? किंवा किती अपघातांची वाट बघतात? हे बघावे लागणार आहे.

कुर्‍हा परिसरातील रस्त्यांवर राखेचा खच

तालुक्यातील वेल्हाळा बंडातून 15 -20 डंपरच्या सहाय्याने रात्रंदिवस राखेची (अ‍ॅश) वाहतुक कुर्‍हा-जामनेर रोडवरुन करण्यात येते. या डंबरचालकांकडून डंपरमधून रखेची ओव्हरलोड वाहतुक होत असल्यामुळे डंपरला दणका लाणे अथवा कट मारणे अशा वेळेत ही राख रस्त्यावर पडत आहे. 17 रोजी कुर्‍हा ते मोंढाळा व कुर्‍हा ते जामनेर रस्त्यावर ठिक ठिकाणी राखेचे खच पडलेले होते.

त्यामुळे रखेवरुन एखादे वाहन गेल्या संपूर्ण रस्त्यावर धुळीचे वातवरण निर्माण होऊन पुढील दृष्य दिसत नव्हते. तसेच कुर्‍हा गावात ही ठिक ठिकणी राख पडलेली असल्यामुळे नागरिकांना स्वसनाचा त्रास झाला. नागरिकांनी स्वत: ही राख जमा करुन घेतली. या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com