स्वच्छ भारत अभियानात जळगाव महापालिकेला थ्री स्टार नामांकन

दिल्लीत महापौर, सहाय्यक आयुक्तांनी स्वीकारला सन्मान
स्वच्छ भारत अभियानात जळगाव महापालिकेला थ्री स्टार नामांकन
महाराष्ट्रातील 69 शहरांमध्ये जळगावचा समावेश होऊन केंद्र सरकारचा कचरामुक्त शहरासाठीचा थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला, ही जळगावकरांसाठी भूषणावह बाब आहे.. हे सर्व शक्य झाले ते जळगावकरांमुळेच. भविष्यातही उत्तमोत्तम कामगिरी करू.
जयश्री महाजन, महापौर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या (Central Government) स्वच्छ भारत अभियानांच्या (Swachh Bharat Abhiyan) स्वच्छ अमृत महोत्सवतंर्गत (Swachh Amrit Mahotsav) जळगाव महापालिकेला (Jalgaon Municipal Corporation) थ्री स्टार (Three star nominations) नामांकन (Received) प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शनिवारी दिल्लीतील विज्ञान भवनात (Vigyan Bhavan in Delhi) झालेल्या शानदार कार्यक्रमात जळगाव महानगरपालिकेचा गौरव (Pride) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्याहस्ते करण्यात आला. महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) आणि आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पवन पाटील (Assistant Commissioner Pawan Patil) यांनी हा सन्मान स्वीकारला.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद केंद्रीय हरदीप सिंग पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर , विका मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ.शिवकुमार डहरीया, अभियान संचालनालयाच्या सहसचिव रुपा मिश्रा उपस्थित होते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात जळगाव महापालिकेचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानातंर्गत केंद्रीय आणि राज्यसमितीने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाअंती जळगाव महापालिकेला थ्री स्टार नामांकन प्राप्त झाले. त्यानुसार शनिवारी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्याहस्ते महापौर जयश्री महाजन आणि आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com