रस्त्यावरील मुरूम काढल्याच्या कारणावरुन तिघांना मारहाण

जुगलखेडा रस्त्यावरील घटना; नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल
रस्त्यावरील मुरूम काढल्याच्या कारणावरुन तिघांना मारहाण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रस्त्यावरील (street) मुरूम काढण्याच्या (removing murum) कारणावरून तीन जणांना (people)बेदम मारहाण (beaten) करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील जुगलखेडा ते कडगाव रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील जुगलखेडा ते कडगाव रस्त्यावर जेसीबीच्या मदतीने मुरूम काढण्याचे काम सतीश भगवानराव खंडवेकर, मुकेश अरुण कोळी आणि अभिषेक कल्याण अलाट हे गुरुवारी दि.13 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता काम करत होते.

त्या ठिकाणी नवल कोळी, कोमल कोळी रा. कडगाव आणि त्यांच्यासोबत असलेले अनोळखी दोन जण यांनी मुरूम काढण्याच्या कारणावरून तिघांना अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

यानंतर सतीश भगवानराव खंडवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नवल कोळी, कोमल कोळी यासह इतर अनोळखी दोन जण यांच्या विरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नूरखान करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com