
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी-
शहरातील कन्नड रोडवरील तंबाखूची कंपनी एच.एच.पटेल कंपनीलगत गटारीचेे बांंधकाम करणार्या उत्तरप्ररदेश येथील तीन कामगारांच्या (Three migrant workers died due to wall collapse) अंगावर कंपनीची जुनी भिंत (wall collapse)कोसळून तिघांचा जागीच मृत्यू (died) झाला आहे. हि घटना दि,१९ रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार चाळीसगाव-कन्नड रोडवरील एच.एच.पटेल कंपनीलगत गटारी बांधकाम करीत असलेले लतीफ विनीतकुमार जुमना प्रसात चौरसिया(२४), मोहम्मद अकील साकील अली (२८), लतीफ रहीम बक्स (३०) सर्व रा.उत्तरप्रदेेश यांच्या अंगावर अचानक कंपनीची जुनी भिंती कोसळून तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
तिघांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोेषीत केेले. दरम्यान एच.एच.पटेल कंपनीच्या निश्काळजीपणामुळेेच तिघांचाही जीव केल्याची चचार्र् परिसरात होती.
याप्रकरणी रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद चाळीसगाव पोेलिसात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.