कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची फसवणूक

रांजनगाव येथील महिलेची तीन लाखांत ऑनलाईन फसवणूक
कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची फसवणूक

जळगाव - jalgaon

तुम्हाला कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागली आहे, अशी बतावणी करत सायबर (Cyber ​​Crime) चोरट्यांनी चाळीसगाव (chalisgaon) तालुक्यातील रांजनगाव येथील महिलेची २ लाख ९२ हजार ७०९ रुपयांत (Online fraud) ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव (Cyber ​​Police) सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची फसवणूक
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

राजनगाव येथे शबानाबानो शेख सादीक वय ४० या वास्तव्यास आहेत. ८ नोव्हेंबर रोजी शबानोबानो यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोनवर बोलणार्‍या संबंधितांने शबानोबानो यांना तुम्हाला २५ लाख रुपयांची कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन वेगवेगळ्या नावांनी संबंधितांनी फोन करुन शबानोबानो यांचा विश्‍वास संपादन केला.

तसेच लॉटरी लागलेले २५ लाख रुपये मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स व इतर चार्जेसच्या नावाखाली शबानोबानो यांना ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार शबानोबानो यांनी संबंधितांना दहा दिवसात वेळावेळी २ लाख ९२ हजार ७०९ रुपये ऑनलाईन पाठविले. पैसे स्विकारल्यानंतर शबानोबानो यांना कुठल्याही प्रकारचे लॉटरी लागल्याचे पैसे मिळाले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर शबानोबानो यांनी बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या क्रमाकांवरुन फोन करणार्‍या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com