वनविभागाच्या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नवापूर तालुक्यातील बोरविहिर, काळंबा, बारीगाव येथे कारवाई
वनविभागाच्या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नवापूर | प्रतिनिधी- nandurbar

नवापूर (Navapur) तालुक्यातील बोरविहिर, काळंबा येथे (Forest Department) वनविभागाने तिन घरांतून ५३ साग चौपाट तसेच बारीगाव येथे चारचाकीसह ११ नंग असा एकुन ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि.५ जून रविवार रोजी पहाटे सहाय्यक (Forest Ranger Nandurbar) वनसंरक्षक नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव) यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांच्यासह वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक, क्षेत्रपाल नवापूर रेंज स्टाफसह नवापूर तालुक्यातील गुमान गावीत,कुष्या गावीत, रा.बोरविहिर, दिलीप गावीत व सुभाष रा. काळंबा यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली.

त्यात ५३ साग चौपाट नग मिळून आले तसेच बारीगाव महसूल शिवारात एका झोपडी जवळ चारचाकी (जी.जे.१९.१४४८) या वाहनाची तपासणी केली असता, त्यात साग चौपाट ११ नग मिळून आले सदरील वाहन व साग चौपाट नग शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले.

सदर कार्यवाहीत साग चौपाट एकूण नग - ६४ व मारुती सुझुकी अल्टो वाहन असा ३ लाखाचा मुद्देमाल आढळुन आला. सदर कारवाहीत सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव ) नंदुरबार धनंजय ग.पवार व वनक्षेत्रपाल नवापूर श्रीमती. स्नेहल अवसरमल, वनपाल दराडे,वनरक्षक कमलेश वसावे,लक्ष्मण पवार,वाहन चालक एस.एस. तुंगार, दिलीप गुरव, वनमजूर बाळकृष्ण गावीत, अनिल गावीत , दिनेश गावित यांनी सहभाग भाग घेतला.

सदर कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार ,उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा कृष्णा भवर, विभागीय वनअधिकारी दक्षता,धुळे रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com