जळगावात दोन अपघातात तीन ठार

शहरातील अजिंठा चौफुली, गुजराल पेट्रोलपंपाजवळील घटना
जळगावात दोन अपघातात तीन ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर सुसाट दुचाकी दुभाजकावर (bike hit the divider) आदळून मयूर विठ्ठल लंके-साळूंखे (वय-19, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (वय-21, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) हे दोघ मित्र चारचाकी वाहनाच्या खाली येवून ठार (killed) झाले. तर दुसर्‍या घटनेत अजिंठा चौफुलीवर भरधाव ट्रकने नगिन सकरू राठोड (वय-38, रा. एमआयडीसी) या तरुणाला चिरडल्याची घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. दिवसभरात झालेल्या दोघ अपघातात (accidents) तिघांचा मृत्यू (Three killed) झाला. याप्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगावात दोन अपघातात तीन ठार
VISUAL STORY : मानसी अन् प्रदीप मध्ये सुरू झालेय सोशल मीडिया वॉर

शहरातील एमआयडीसी भागात राहणारे नगिन सकरू राठोड आणि उदय गजाजन राठोड हे दोघ कामानिमित्त सुनसगाव येथे गेले होते. काम आटोपून जळगावात आल्यानंतर ते रात्री 8 वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर थांबले. त्यानंतर आकाशीवाणीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक (क्र.एमएच 40, बीजी 8915) ने त्यांना जोरदार धडक दिली. यात नगिन राठोड हा ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच ठार झाला तर उदय गंभीर जखमी झाला आहे. दोघं जण बांधकाम आणि भंगार व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. मयताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

भरधाव वेगाने दुचाकी चालविणे जीवावर बेतले

जळगावातील मित्राला भेटून मयूर लंके- साळुंखे आणि दीपक पाटील हे दुचाकीने आपल्या गावाकडे निघाले होतेे. शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावरील दुभाजकावर त्यांची दुचाकी आदळली. परंतु दोघ तरुण सुसाट वेगाने असल्याने ते दुभाजावर लावलेले फायबरचे कठडे तोडून दुसर्‍या बाजूला रस्त्यावर फेकले गेले. यावेळी त्याठिकाणाहून येणार्‍या चारचाकी वाहनाची खाली दोघ तरुण आल्याने मयूर याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक हा गंभीर जखमी झाला होता.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

वाहनाखाली आल्याने दीपक याच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती.

जळगावात दोन अपघातात तीन ठार
VISUAL STORY : या वर्षात कोणकोणत्या सेलिब्रेटींनी बांधली रेशीम गाठ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com