जिल्ह्यात कोरोनाचे तीन बाधित रुग्ण

दिवसभरात 4 कोरोनामुक्त तर जिल्हाभरात 25 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचे तीन बाधित रुग्ण

जळगाव । Jalgaon

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले असून 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 25 वर पोहचली आहे.

जिल्ह्यात बुधवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 1, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 1 अस एकूण 3 बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड या 13 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 641 एवढी झाली आहे. दुसरीकडे 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

1 लाख 40 हजार 41 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 25 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com