रावेरमधून जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदार संघात तीन उमेदवार रिंगणात

काँग्रेसचे राजीव पाटील देखील ऐनवेळी रिंगणात
रावेरमधून जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदार संघात तीन उमेदवार रिंगणात

रावेर|प्रतिनिधी raver

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी रावेरमधून राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला माजी आमदार अरुण पाटील थेट भाजपच्या गळाला लागल्याने, काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे आता भाजप पुरुस्कृत झालेले अरुण पाटील,काँग्रेसच्या जनाबाई महाजन व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील रिंगणात उतरले आहे.

माघारीच्या शेवटच्या दिवशी रावेरमधून सोसायटी मतदार संघात कैलास सरोदे,नंदकिशोर महाजन, मंदाकिनी राजेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.तर इतर संस्था मतदार संघातून ज्ञानेश्वर महाजन,प्रकाश पाटील,महिला राखीव मतदार संघातून छायाबाई महाजन यांनी अर्ज मागे घेतले.आता सोसायटी मतदार संघात चुरस पाहायला मिळणार आहे.या ठिकाणी माजी आमदार अरुण पाटील,जनाबाई महाजन,राजीव पाटील असे तीन उमेदवार सोसायटी मतदार संघातून रिंगणात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com