जळगाव मास्टर कॉलनीतील घरफोडी करणारे तिघे जेरबंद

तिघेही सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव मास्टर कॉलनीतील घरफोडी करणारे तिघे जेरबंद

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी करणार्‍या सराईत तिघ गुन्हेगारांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी केलेली सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली आहे. शहरातील नशेमन कॉलनीतील मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यांच्या घरातून 40 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना दि. 28 जुलै रोजी घडली होती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही घटना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झाली असल्याने पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथां यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही घरफोडी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली (वय-19), सलीम उर्फ सल्या शेख कय्युम (वय-26) दोघ रा. तांबापूरा व सरजील सैय्यद हरुन सैय्यद (वय-26) रा. मास्टर कॉलनी यांनी केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीतील मंगलपोत हस्तगत करण्यात आली आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोना सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने केली.

तिघांवर गंभीर गुन्हे दाखल

घरफोडीतील संशयित ईश्तीयाक अली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर चोरी, घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच सलीम उर्फ सल्या शेख याच्यावर दोन चोरीचे तर सर्जील याच्यावर खुनाचा प्रयत्न व मारामारीचे दोन गुन्हे दाखल असून तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com