नऊ लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना पकडले

स्टेट बँकेच्या पारोळा शाखेत मोजत होते नोटा; व्यवस्थापकांच्या चातुर्याने उघडकीस आला प्रकार
चोरी
चोरी

पारोळा Parola । प्रतिनिधी-

येथील स्टेट बँकेच्या (State Bank Branch) शाखेत नोटांमध्ये फसवणूक (Fraud in notes) झाल्याचा संशय आल्याने कल्याण (Kalyan) येथील पितापुत्र (father son) तब्बल नऊ लाखांच्या (nine lakhs) बनावट नोटा (Counterfeit notes) मोजण्यासाठी (count) आले होते. यावेळी शाखा व्यवस्थापकांच्या (Branch Managers) लक्षात ही बाब आल्याने त्यांनी दोघांना (Both are) पोलिसांच्या ताब्यात (police custody) दिले. पितापुत्रांनी 500 रुपयांच्या 1800 नोटा आणल्या होत्या त्यात 10 नोटा या खर्‍या होत्या. पारोळा पोलिसांनी दोघांसह चालकाला ताब्यात घेवून गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

पारोळा येथील स्टेट बँकेच्या शाखेत दोन जण त्यांचेकडील 500 रुपये दराच्या नोटा मोजण्यासाठी आले. त्यांचेकडील नोटा पाहता सुमारे तीन लाख रुपयांच्या म्हणजेच 500 रुपये दराच्या 600 नोटांपैकी फक्त 2 नोटा खर्‍या आहेत व उर्वरित 598 या बनावट आहेत, त्या दोघांना बँकेत थांबवून ठेवले आहे, अशी माहिती शाखा व्यवस्थापक किरण बिडकर यांनी पारोळा पोलीस निरीक्षकांना कळविली. पोलीस निरीक्षक स्वत: स्टेट बँक ऑफ इंडीयाचे शाखेत गेले. त्यांनी बनावट नोटा मोजण्यासाठी आलेल्या दोघंची विचारपुस केली. त्यांनी त्यांचे नाव मंगेश गुलाबराव वाडेकर (वय 48, धंदा-सिव्हील इंजिनिअर) व यश मंगेश वाडेकर (वय 18, धंदा-शिक्षण, एएमई साठी अ‍ॅडमिशन घेणे आहे.) दोघे रा. 302 साईशरनम वाडेकडर रोड कल्याण पश्चीम 421301) तसेच त्यांचेसोबत असलेल्या कारचा चालकाचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव अभिषेक मधुकर चव्हाण (वय 19, धंदा शिक्षण रा. रोहीणी कृपा पहीला मजला रुम नं.8 आरटीओ कार्यालयाजवळ कल्याण पश्चीम) असे सांगितले.

तिघांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले तसेच बँक अधिकारी यांनी नोटा मोजुन सविस्तर रिपोर्ट पोलीस स्टेशन येथे दाखल केला. प्रकरणाबाबत चौकशी करता, त्यांनी बनावट नोटा भुसावळ बाजारपेठ हद्दीतील रेल्वेस्थानकाजळुन क्वीक ऑनलाईन लोन, विनाकागदपत्रांवर लोन अशाप्रकारे क्रमांक 2 यांचे शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेपोटी विकास म्हात्रे (पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही) व आणखी एक अनोळखी यांचेकडुन ताब्यात घेतल्या. त्या बनावट असतील अशी कल्पना नसल्यामुळे घेतल्या.

नमुद नोटा ताब्यात घेतल्यानंतर संशय आल्याने त्या पारोळा येथील स्टेट बँकेत तपासुन पाहील्यानंतर बनावट असल्याची खात्री झाली असुन फसवणुक झाली आहे, असे सांगितले तसेच प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. दोघांकडे तिन लाख रुपयांव्यतिरिक्त विकास म्हात्रे व त्यासोबतचा अनोळखी व्यक्तीनेे आणखी सहा लाख रुपये दिले होते त्याची पोलीस स्टेशन येथे तपासणी केली असता 1200 नोटा बनावट व 8 नोटा खर्‍या अशा मिळुन आल्या.

अशा एकुन बँकेत मिळालेले व पोलीस स्टेशन येथे मिळालेले नऊ लाख रुपये रक्कमेच्या बनावट 1800 नोटा व पाच हाजार रुपयांच्या 10 खर्‍या नोटा मिळुन आल्या आहेत. याबाबत प्राथमिक चौकशी अंती मंगेश गुलाबराव वाडेकर यांचेसह इतर दोन जणांची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाले.

घटनेचे घटनास्थळ हे भुसावळ बाजारपेठ हद्दीत असल्याने अपर पोलीस अधिक्षक जळगांव भाग, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांचेसोबत चर्चा करुन त्यांचे आदेश व सुचनाप्रमाणे नमुद प्रकरणातील 500रुपये दराच्या 1800 बनावट नोटा, व 500 रु दराच्या 10 खर्‍या नोटा अशा सर्व मुददेमालासहवर तिघांना भुसावळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शुन्य क्रमांकाने गुन्हा वर्ग करण्यात अला आहे.

शाखा व्यवस्थापकांची चतुराई

शाखेत आलेल्या वडिल व मुलाने नोटा मोजण्यासठी दिल्यानंतर त्या मोजत असताना नोटा बनावट असल्याची बाब शाखा व्यवस्थापक किरण बीडकर यांच्या लक्षात आली. त्यांनी नोटा मोजणीचे काम चालू असताना मोठ्या चातुर्याने आधी बँकेचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. व पोलिसांना फोन करुन माहिती देत बोलावून घेतले. अतिशय जागरुकपणे त्यांनी हे प्रकरण हाताळले, यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com