कंपनीतून साहित्य चोरणारे तिघे अटकेत

तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी : ४० हजाराचा ऐवज जप्त
कंपनीतून साहित्य चोरणारे तिघे अटकेत

जळगाव : Jalgaon

चिंचोली शिवारातील फ्रिन्स एन्टरप्रायजेस कंपनीतून लोखंडी साहित्य चोरणार्‍या मनोज लक्ष्मण पवार (४१, रा.शाहू नगर), भरत मधुकर सोनार (२७, रा.सुप्रीम कॉलनी) व प्रशांत पंडितराव साबळे (२६, रा.सुप्रीम कॉलनी) या तिघांना मशनरी स्टँडला लागणारा लोखंडी रोल व बेरींग बॉक्स आदी साहित्याची चोरी करतांना कंपनीच्या वॉचमनच्या सतर्कतेमुळे तिघांना पकडण्यात यश आले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

प्राप्त माहितीनुसार धनराज भिका पाटील (४५,रा.राम मंदिराजवळ, जळगाव) यांच्या मालकीची चिंचोली शिवारात भवानी मातेच्या मंदिराजवळ फ्रिन्स एन्टरप्रायजेस ही लोखंडी आसारी बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीत जगन सोनवणे वॉचमन असून मंगळवारी सकाळी ६ वाजता एका रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.६६४९) तीन जण कंपनीतील लोंखडी साहित्य भरताना दिसले. सोनवणे यांनी तिघांना पकडून मालकाला तातडीने घटनास्थळी बोलावले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.

हवालदार दिनकर खैरनार, शांताराम पाटील व सिद्धेश्वर डापकर यांनी तिघांना ताब्यात घेऊन १५ हजाराचे साहित्य व २५ हजाराची रिक्षा असा ४० हजाराचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यातील प्रशांत साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com