जिल्हा बँक निवडणूकीसाठी तीन अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणूकीसाठी  तीन अर्ज दाखल
jdcc bank jalgaon

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या (District Bank) निवडणुकीची (Election)रणधुमाळी सुरु झाली आहे. 11 रोजी पासून नामनिर्देश अर्ज दाखल (Nomination application) करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी दुसर्‍याच दिवशी तीन उमेदवारांनी (three candidates) आपले अर्ज दाखल (Application filed) केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज खरेदीला सुरवात झाली आहे. मंगळवारी दि. 12 रोजी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये वाल्मिक किसन पाटील यांनी इतर संस्था मतदार संघातून अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जावर सुचक शांतीलाल लोटन पाटील तर अनुमोदक म्हणून संभाजी शामराव पाटील हे आहेत. तसेच प्रकाश एकनाथ पाटील यांनी इतर संस्था यातून अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जाला आदित्य प्रकाश देवरे (पाटील) यांनी सूचक म्हणून तर राजेंद्र धूडकू पाटील यांनी अनुमोदक केले आहे. त्याचप्रमाणे तिसर्‍या अर्ज हा चोपडा विका मतदार संघातून गोकुळ पंढरीनाथ पाटील यांनी दाखल केला असून त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून चंद्रशेखर युवराज पाटील तर कांतीलाल गणपत पाईल यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिली.

Related Stories

No stories found.