पिकांना ‘मावा’चा धोका

पावसाच्या उघडीपअभावी आंतर मशागतीची कामे खोळंबली
पिकांना ‘मावा’चा धोका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या पंधवड्यात संततधार पाऊस (Heavy rain) सुरु होता. आताही या आठवड्यात अधूनमधून पावसाच्या सरींची हजेरी लागत असून दिवभर ढगाळ वातावरणामुळे जमीनीची वाफ (ground steam) होत नसल्याने आंतर पिकांच्या मशागतीची कामे (Intercropping works) खोळंबली आहे. तसेच काळीच्या जमिनीत पाणी साचले असल्याने काही ठिकाणी पिेके पिवळसर (Crops yellowish) पडत आहे. त्यामुळे मर रोग आणि मावा किडीचा प्रादुर्भाव (Insect infestation) वाढण्याचा धोका (danger) वाढला असल्याचे कृषी विभागाच्या (Department of Agriculture) सूत्रांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात 93 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित 7 टक्के पेरण्या सततच्या पावसामुळे रखडलेल्या आहेत. जून-जुलै महिन्यात सरासरी 60 टक्के पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यात सरासरी 123 टक्के पाऊस झाला आहे. ज्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आणि काळी जमिनीच्या शेतात पाणी साचले आहे त्याठिकाणी पिके पिवळी पडून मररोग वाढण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यात सध्या कोणत्याही तालुक्यात ओला दुष्काळाची परिस्थिती नसली तरी आता पावसाने उघडीप दिल्यास शेतातील आंतर मशागतीची कामे करण्यासाठी शेतकर्‍यांना फायद्याचे ठरणार आहे.

सततच्या पावसामुळे मूग, उडीद पिकांना फटका

15 जुलैपर्यंत तीळ, मूग, उडीद, चवळी या पिकांची पेरणी होणे अपेक्षित होते. मात्र, सततच्या पावसामुळे शेतातील तीळ, मूग, उडीद, चवळी या पिकांचा पेरा घटला आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी जमिनी पडिक पडत असून गोरगरिबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामधील विहिरी सततच्या पावसामुळे खचल्या आहेत. त्या भागात नुकसान झाले आहे. त्याठिकाणी पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

काळी जमिनीच्या शेतात पाणीच पाणी

कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना या पावसाचा लाभ झाला असला तरी विशेषतः काळी जमिनीच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीला तलावाचे स्वरुप आले आहे. नदी आणि नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने जमीनचे नुकसान झाले आहे. शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी व कडाक्याची थंडी या आपत्तींचा समावेश आहे. त्यानुसार झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

दुबार पेरणीचे संकट टळले

जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी हवालदील झाले होते. मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळे पिकांची उगवण आणि चांगली झाली असून शेतामध्ये पिके डोलू लागले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच शेतामध्ये कपाशीचे पिके डोलू लागले आहेत. ज्या भागात जमिनीत पाणी साचले असेल त्याठिकाणी किडी,मावा,तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. त्याठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे.

वैभव शिंदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.जळगाव

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतात पिकांची स्थिती उत्तम असून सततच्या पावसामुळे काही ठिकाणी जमिनीत पाणी साचले आहे. त्याठिकाणी पाण्याचा निचरा करावा. तसेच कपाशीवर वेळीच किटकनाशक फवाणी करुन पिकांची निगा ठेवण्याची गरज आहे.

अनिल भोकरे, उपसंचालक कृषी विभाग, जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com