मनपाचे थकबाकीदार असलेल्यांनी ही बातमी वाचलीच पाहीजे !
Jalgaon Municipal Corporation

मनपाचे थकबाकीदार असलेल्यांनी ही बातमी वाचलीच पाहीजे !

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महानगरपालिका (Municipal Corporation) हद्दीतील थकबाकी (Arrears) मिळकतधारकांसाठी (property owners) मनपा प्रशासनाने अभय योजना (Abhay Yojana implemented) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.ही योजना दि.15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2022 पर्यंत लागू करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील (Deputy Commissioner Prashant Patil) यांनी दिली आहे.

मालमत्ता कराची वसुली व्हावी त्याशिवाय थकबाकीधारकांना दिलासा मिळावा या उद्देशाने मालमत्ता कराच्या शास्ती माफीसाठी अभय योजना सुरु करण्यात आली आहे. दि.15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2021 पर्यंत 90 टक्के, दि.15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत 75 टक्के तर दि. 1 जानेवारी ते 15 जानेेवारी 2022 पर्यंत 50 टक्के शास्तीच्या रकमेवर सूट दिली जाणार आहे. खुला भुखंड करासाठीही ही योजना लागू असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com