यंदाही मकर संक्रांतीवर कोरोनाचे सावट

यंदाही मकर संक्रांतीवर कोरोनाचे सावट

सुवासिनींकडून दिल्या जाणार्‍या वाणाच्या दरात 20 टक्क्यांनी भाववाढ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. संक्रांतीच्या वाण खरेदीसाठी व तयारीसाठी महिलांची जळगावात लगबग सुरू झाली आहे. हळदी-कुंकू, तिळगुळासह वाणाचे साहित्य (Materials of the variety) खरेदीसाठी शहरातील टॉवर चौक परिसर, सुभाष चौकासह विविध भागातील बाजारपेठेत थाटलेल्या दुकानावर कोरोनाचे सावट (Coronary artery) पसरले असल्याने अल्प प्रतिसाद मिळत आहे.

14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीला तिळगूळ द्या, गोड गोड बोला, असा संदेश देत एकमेकांविषयी प्रेम व आदर व्यक्त करण्याचा सण होय. मकर संक्रांतीनिमित्त प्लास्टिक, काच, स्टिल,तांबे, पितळ याच्यासह कापडी व कागदी साहित्याला देखील विशेष मागणी आहे. बाजारात सुगड्यांसोबतच विविध प्रकारचे वाण, तिळगुळ, बांगड्या आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

यावर्षी वाणाच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले. मात्र,कोरोनाच्या सावटामुळे वाण खरेदीवर परिणाम झाला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी देण्यात येणार्‍या वाणात वैविध्य असावे अशी महिला वर्गाची इच्छा असते. त्यामध्ये कुंकवाचे विविध प्रकारचे करंडे, कुयर्‍या, बांगड्यांचे सेट, कापडी बटवे, मोबाइल कव्हर, साडी व ब्लाऊज कव्हर, कापडी पिशव्या आदीचा समावेश आहे. संक्रांतीच्या वाणाने बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी ग्राहकाने प्रतीक्षा लागली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा फटका

गेल्या वर्षी कोरोनामुळे संक्रांतीच्या खरेदीसाठी महिलांचा फारसा प्रतिसाद नव्हता. या वर्षीसुद्धा मकर संक्रांतीच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याने पारंपरिक वाण साहित्यासोबतच कापडी व कागदी पिशव्या भेट देण्यावर विरजण पडणार आहे. दरवर्षी संक्रांतीसाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी होते, परंतु यंदा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे संमिश्र प्रतिसाद पहायला मिळत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com