सुनसगावात धनगर समाजातर्फे दिवाळीत अजुनही पाळली जातेय ही प्रथा !

सुनसगावात धनगर समाजातर्फे दिवाळीत अजुनही पाळली जातेय ही प्रथा !

सुनसगाव,Sunsagaon ता.भुसावळ । वार्ताहर

कोणताही सण (Festival) आला की, सर्वत्र लगबग पाहायला मिळते. मात्र काही सण असे असतात की आपल्याला परंपरांची (Traditions) आठवण करून दिली जाते . असाच दिवाळी हा सण महत्वाचा मानला जातो. यात व्यापारी आपल्या व्यवसायात तर शेतकरी आपला हंगामाचा हिशोब जोडण्यात असतो. मात्र काही लोक आपल्या परंपरा कायम राखण्यासाठी खटाटोप करीत असतात. अशीच एक परंपरा सुनसगावात शेकडो वर्षांपासून गावातून दिवाळीच्या (Diwali) दिवशी दिवटी (Divati) हातात घेऊन घरोघरी जाऊन दिवाळी पुजनाची (Diwali worship) प्रथा (Practice) धनगर समाजाने (Dhangar community) सतत सुरू ठेवली आहे.

कोरोनाचा काळ असल्याने ही प्रथा बंद ठेवण्यात आली होती. धन धन रे दिवायी... गाई म्हशीले ओवाई... ही वाक्यं कानी पडतात ते ही फक्त दिवाळीच्या दिवशी.

येथील धनगर समाज बांधवांनी शेकडो वर्षांपासून गावातून दिवाळीच्या दिवशी दिवटी हातात घेऊन घरोघरी जाऊन दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे, आजही पिढीजात चालत आलेली दिवाळी काढण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

दिवाळीची तयारी करण्यासाठी हे धनगर बांधव उंच बोरू आणतात आणि काठ्यांचा आधार घेऊन सुंदर अशी दिवटी तयार करतात आणि धन धन रे दिवायी, गाई म्हशीले ओवाई अशी गाणी तसेच वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळीचे गाणे गात दिवाळी साजरी करतात. विशेष म्हणजे हे बांधव रात्रभर गावात फिरतात. आणि गावातील महिला आपल्या घरासमोर दिवाळी आल्यावर दिवटीमध्ये तेल टाकून धान्य, फराळ तसेच दक्षिणा देतात तसेच काही ठिकाणी आवडगोडिच्या माणसांची मस्करी करताना हेडा म्हणण्याची पद्धत यावेळी आहे.

बाहेर गावाला नोकरीनिमित्ताने असलेले नागरीकांना या दिवाळीचे मोठे आकर्षण असून प्रत्येक जण आता मोबाईलमध्ये चित्रीकरण करुन घेतात तर फोटो काढून ठेवतात. अशा प्रकारे सुनसगावची दिवाळीची परंपरा आजही धनगर समाजाने टिकवून ठेवली असून आता ही परंपरा धनगर समाजाचे हरी सुका कंकरे यांचे परिवारातील मुल, पुतणे, नातू तसेच वही भजन मंडळीने सुरू ठेवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com