
मुंबई । प्रतिनिधी । Mumbai
19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव या संस्थेच्या ‘हालगी सम्राट’ (Halgi Samrat) या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या ‘चम चम चमको’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक - दिपक वाघ (नाटक- हालगी सम्राट), द्वितीय पारितोषिक -सोनाली वासकर (नाटक-चम चम चमको), प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक - प्रांजल पंडीत (नाटक-राक्षस), द्वितीय पारितोषिक- भावेश पाटील (नाटक-क ला काना का ? ), नेपथ्य : प्रथम पारितोषिक - अरविंद बडगुजर (नाटक- ढ नावाची आधुनिकता), द्वितीय पारितोषिक - अनिरुध्द किरकिरे (नाटक- किंमत एका झाडाची), रंगभूषा : प्रथम पारितोषिक- पंकज साखरे (नाटक- खेळण्यांची करामत), द्वितीय पारितोषिक - वंदना वाणी (नाटक- लिव्ह मी) उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक प्रणित जाधव (नाटक- हालगी सम्राट) व पियुषा महाजन (नाटक - चम चम चमको), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे - गायत्री भोसले (नाटक - चम चम चमको), स्वराली जोशी (नाटक- क ला काना का ?), मैत्रयी किरकीरे ( नाटक - किंमत एका झाडाची), भुमिका गावडे (नाटक- मरी गई), वैष्णवी भोई (नाटक-मरी गई), अथर्व पाटील (नाटक - हालगी सम्राट), आदित्य पाटील (नाटक- खेळण्याची करामत), पियुष बालाजीवले (नाटक-वारी), आदित्य काळे (नाटक- द बटरफ्लाईन), गगनदीप पवार ( नाटक - ढगाला लागली कळ).
दि. 10 जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज नाटयगृह, जळगाव येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 19 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शैलेंद्र खंडागळे, श्रीमती राधिका देशपांडे आणि सिध्दार्थ म्हस्के यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.