
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव शहराला पाणीपुरवठा केल्या जाणार्या वाघुर जलवाहिनी (Waghur channel) व अमृत योजनेअंतर्गत (Amrit Yojana) नवीन टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम 72 तासानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभगातर्फे (Municipal Water Supply Department) पूर्ण करण्यात आल आहे. त्यामुळे उद्यापासून जळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत (Water supply smooth) होणार आहे.
मेहरुण येथील औरंगाबाद रोडवरील कस्तुरी हॉटेल जवळील चौकात 1200 मी.मी.ची पाईप लाईन जोडणीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 22 जानेवारी रोजी हाती घेतले होते. 48 तासांचा अवधी या कामासाठी लागणार होता. परंतू, जलवाहिनी जोडणी केल्यानंतर जलवाहिनीची चाचणी घेतांना काही ठिकाणी गळती आढळून आली. त्यामुळे त्या दुरुस्त्या करण्यासाठी एक दिवस पाणी पुरवठा लांबला होता.
असा होणार पाणीपुरवठा
22 रोजी होणारा पाणीपुरवठा हा 25 रोजी, 23 व 24 रोजी होणारा पाणीपुरवठा 26 व 27 रोजी त्या-त्या परिसरात नियोजीत वेळापत्रकानुसार होणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने गृहिणांमध्ये समाधानाचे वातावरण होते.