PM KISAN सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी हे बंधनकारक...!

PM KISAN सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी हे बंधनकारक...!

जळगाव - jalgaon

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेतंर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात 6 हजार रुपयांचा प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येतो. या योजनेच्या सुरूवातीपासून एकूण 13 हप्त्यात राज्यातील 110.39 लाख लाभार्थींना 23607.94 कोटी रुपयांचा लाभ अदा झाला आहे.

PM KISAN सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी हे बंधनकारक...!
गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

केंद्र शासन स्तरावर योजनेच्या एप्रिल ते जुलै, 2023 कालावधीतील 14 व्या हप्त्याचे नियोजन सुरू असून माहे मे, 2023 मध्ये या हप्त्याचा लाभ दिला जाईल. तथापी, केंद्र शासनाने 14 व्या हप्त्यासाठी लाभार्थींच्या भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे, लाभार्थींची बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, e-KYC प्रमाणिकरण करणे बंधनकारक केले आहे.

भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थींनी संबंधित तहसिलदार तथा तालुका नोडल अधिकारी पीएमकिसान यांच्याकडून त्यांच्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व eKYC प्रमाणिकरण करणे या दोन्ही बाबींची पुर्तता लाभार्थीने स्वत: करायची आहे. लाभार्थीने स्वत:च्या सोईनुसार e-KYC पडताळणीसाठी पीएमकिसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत या दोनपैकी एका सुविधेच्या आधारे त्यांची e-KYC पडताळणी करावी. तसेच बँकेत समक्ष जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे. या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या पात्र लाभार्थीनाच पुढील हप्त्याचा लाभ अदा करणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com