समुपदेशन हाच एकमेव पर्याय!

समुपदेशन हाच 
एकमेव पर्याय!

अमोल कासार

जिल्ह्यात शनिवारी दोन खूनाच्या घटना घडल्या. या रक्तरंजीत घटनांमुळे संपुर्ण जिल्हाच हादरला. कारण या दोघ घटनांना किनार होती ती अनैतिक संबंधाची. विवाहबाह्य संबंध ही एक सामाजिक समस्या बनू पाहत आहे. समाजात प्रत्येक समस्येवर सामूहिक उपाय देखील आहेत. या सामुहिक उपायातूनच समुपदेशनाची गरज निर्माण होते.

शहरातील समता नगर परिसरात पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीने प्रियकराची तर शिवाजी नगर हुडको परिसरात विवाहितेच्या प्रियकराने दुसर्‍या प्रियकराचा निर्घुन खून केल्याची घटना घडली. चोवीस तासात शहरात दोन रक्तरंजीत घटना घडल्याने संपुर्ण समाजमन सुन्न झाले होते. या दोघ घटनांमध्ये मयत झालेले तरुण हे 28 वर्षांचे असून दोघेही अविवाहित होते.दोन्ही घटनांना किनार होती ती अनैतिक संबंधाची.

ऐन भविष्य घडविण्याच्या वयात आजची तरुण पिढी ही गुन्हेगारी, व्यसनाधीन किंवा अनैतिक संबधांकडे वळत आहे. विवाहबाह्य अनैतिक संबंधांमध्ये गुंतत आहे. त्यातूनच गुन्हेगारी देखील फोफावत असल्याचे दिसून येत आहे. यात गुंतत चाललेल्या तरुण पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी एकमेव उपाय म्हणजेच समुपदेशन हा आहे.

यात गुरफटलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी पोलीस दल व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून समुपदेशन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. ऐन उमेदीच्या काळात व्यसनाधिनता, दादागिरी, रोडरोमीओगिरी, प्रेमसंबंधांमध्ये गुंतलेली तरुण पिढी भविष्यातील धोक्यांमधुन बाहेर पडेल आणि चारित्र्यवान समाजाची निर्मिती होईल एवढे निश्चीत !

Related Stories

No stories found.