Photos # बोदवडच्या राका विद्यालयाच्या शिक्षकांचा असाही आदर्श : शिकवण्यासोबत कृतीतूनही आचरण...

11 वर्षापासून साजरी करताहेत वंचितांची दिवाळी
Photos # बोदवडच्या राका विद्यालयाच्या शिक्षकांचा असाही आदर्श : शिकवण्यासोबत कृतीतूनही आचरण...

बोदवड Bodwad प्रतिनिधी :

  न.ह.रांका हायस्कूल (Raka Vidyalaya) व कनिष्ठ महा. मधील शिक्षक (teachers) सन  2012 पासून दिवाळीच्या (Diwali) दिवशीच  परिसरातील (area) दीनदलित, आदिवासी वाड्या- वस्तीवर (Tribal mansions- on the settlement) जाऊन दिवाळी साजरी (Diwali celebration) करीत आहे.

यावर्षी  दिवाळी साजरी करण्याचे सलग अकरावे  वर्ष आहे.  या निमित्त शाळेत माजी ग्रंथपाल व्ही.व्ही पाटील सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन होऊन गरजू लोकांच्या घरापर्यंत विद्यार्थी ,शिक्षक पोहोचले व त्यांनी त्या गरजुंना फराळ देऊन दिवाळी साजरी केली.  कोणालाही रस्त्यावर फराळ न-देता त्यांच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक फराळ दिले. शाळेसमोर असलेली तलावावरील वस्ती, पोलीस स्टेशन समोरील  वस्ती , कब्रस्तान रोडलगतची वस्ती ,जामठीरोड स्मशानभूमी परिसरातील वस्ती, अण्णाभाऊ साठे नगर, उजनी रोडलगतचे एकलव्य नगर व आत्मसन्मान फाउंडेशन या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष दिवाळी साजरी केली.

आत्मसम्मान फाउंडेशन येथे विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून व रुग्णासोबत जोरजोरात हसून आनंदमय वातावरणाची निर्मिती केली. दिवाळीच्या फराळासाठी श्रीमती मंजूलताजी सुराणा, मनोजकुमारजी बरडिया , विशाल बरडिया, विनयकुमार बाफना, इब्राहिमशेठ बोहरा , पर्यवेक्षक जे.एन माळी सर, माजी ग्रंथपाल व्ही. व्ही पाटील सर , एस एस नंदवे सर, सचिन सत्रे सर , रेणुका देवी विद्यालयाचे मुकेश बुंदे सर, पंडित वंजारी  यांनी व शाळेतील उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी घरून फराळ आणले होते.

सदर उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन.सचिव विकासजी कोटेचा ,माजी चेअरमन प्रकाशचंद्जी सुराणा यांनी सर्वांचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील सर,पर्यवेक्षक आर.के.तायडे सर,पर्यवेक्षक जे.एन.माळी सर, ओ.एस. श्री अंबुसकर सर,खडसे सर, एन.यु.बागुल सर, अतुल पाटील सर, ए.एस.कोल्हे सर, सचिन सत्रे सर, दीपक बडगुजर,प्रेम वंजारी, विनोद जैन, दीपक चौधरीसर व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com