डॉक्टरांच्या घरासह दवाखान्यातून चोरट्यांनी ८० हजारांची रोकड लांबविली

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डॉक्टरांच्या घरासह दवाखान्यातून चोरट्यांनी ८० हजारांची रोकड लांबविली

जळगाव : Jalgaon

शहरातील रिंगरोडवरील ब्रुकबॉन्ड कॉलनीतील डॉ. प्रशांत जाधव यांचे दवाखान्यासह घरातून चोरट्यांनी ८० हजारांची रोकड लांबविल्याची घटना समोर सोमवारी आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रिंगरोडवर ब्रुकबॉन्ड कॉलनीत डॉ. प्रशांत भिमराव जाधव यांचा दवाखाना आहे. दवाखान्याच्या वरती त्यांचे घर असून ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास डॉ. प्रशांत जाधव हे कुटुंबासोबत औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे गेले होते. त्यामुळे घर आणि दवाखाना बंद होता. दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दवाखाना उघडल्यावर दवाखान्यातील कर्मचारी नितेश शिवाजी पाटील यांना दवाखान्यातील सामान व फाईल अस्ताव्यस्त पडलेला दिसल्या. तसेच डॉक्टरांच्या घराच्या दरवाजाचे कुलूत तुटलेले तर घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

याबाबत नितेश पाटील यांनी डॉ. प्रशांत जाधव यांना फोनवरुन माहिती दिली. माहिती मिळताच डॉ. जाधव हे जळगावात आले. पाहणी केली असता, दवाखान्यातील त्यांच्या कॅबीनमधील ड्राव्हरमध्ये ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड तसेच घरातील कपाटात ठेवलेली ६० हजारांची रोकड अशी एकूण ८० हजार रुपये चोरट्यांनी लांबविले असल्याचे समोर आले. याबाबत डॉ. प्रशांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com