रांची एक्सप्रेसमधून १८ हजारांचा ऐवज लंपास

भुसावळ रेल्वेस्थानकाच्या आउटरवरील घटना
रांची एक्सप्रेसमधून १८ हजारांचा ऐवज लंपास

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकाच्या आउटर (Railway station outer) भागात अज्ञात चोरट्याने १८ हजार रुपयांच्या ऐवजाची पर्स लांबविल्याची घटना ६ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत लोहमार्ग पोलिसात (Lohamarga Police) गुन्हा दाखल करण्यात आला.
लोहमार्ग पोलिसांकडून मियालेल्या माहितीनुसार, रोप अली विमल राजेश पटेल (Rop ali Vimal Rajesh Patel) (वय ४६, रा. प्लॉट नं. २३, सिडको महानगर (Cidco), औरंगाबाद (Aurangabad) हे गाडी क्र. १८६०९ (Train No 18609) अप रांची एक्सप्रेसने (Up Ranchi EXpress) च्या डबा क्र. एस.१२ सीट क्र. ४९ वरुन रांची (ranchi) ते मनमाड (Manmad) असा प्रवास करत असतांना दि. ६ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास गाडी भुसावळ स्थानकावरुन सुटत असतांना अज्ञात चोरट्याने पर्स लांबविली त्यात रोख दोन हजार, १६ हजार रुपयांचा मोबाईलसह चार एटीएम, आधारकार्ड, पॅन कार्ड असे महत्वाची कागदपत्रे लांबविली.

याबाबत पटेल यांनी मनगाड लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. तेथून भुसावळ लोहमार्ग पोलिसात ‘शुन्य’ क्रमांकाने वर्ग करण्यात येवून अज्ञात आरोपी विरद्ध गु.र.नं. ३१२/ २२, भा.दं.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय मधूकर पारधी (ASI Madhukar Pardhi) करीत आहे.

Related Stories

No stories found.