विवरा येथे रात्री चोरट्यांचा धुमाकूळ

मंदिराची दान पेटी, चार घरे, दारू दुकानात झाली चोरी
विवरा येथे रात्री चोरट्यांचा धुमाकूळ

रावेर|प्रतिनिधी raver

विवरे बुद्रुक (ता.रावेर) येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत ६ ठिकाणी चोरी करून खळबळ उडवून दिली आहे. यात अंदाजे ५० हजाराची चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. निंभोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, चोरी झाल्याच्या स्थळांची माहिती घेत आहे.

येथील उटखेडा रोडवरील विवरे खुर्द येथिल दारू दुकानाचे मेन गेटचे व दरवाजाची कडी तोडून दुकानाच्या गल्ल्यातील अंदाजे ३७ हजार रुपये दुकानाच्या मागे राहुल आमोदे याच्या घराच्या दरवाज्याची कडी तोडून घरातील सर्व सामान फेकाफेक करून ५०० रुपये, रामा पाटील यांच्या घरातून ८ हजार व २ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दागिने, विवरे बुद्रुक येथील मधुकर टेम्पे यांच्या घरातून २२ भार चांदी, रेणुका माता मंदिराची दान पेटी, मधुकर कुंभार यांच्या बंद घराची कडी तोडून चोरी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.घटनास्थळी निंभोरा पोलीस दाखल झाले असून,चोरी झालेल्या स्थळांची पाहणी करून माहिती घेत आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com