पोलन पेठेतील फटाक्याच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला

अडीच लाखाच्या रॉकडसह कागदपत्रे लांबविले : शहर पोलिसात गुन्हा
पोलन पेठेतील फटाक्याच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला

जळगाव jalgaon

शहरातील पोलन पेठ (Polan Peth) येथील महाराष्ट्र फटाके दुकानातल्या (Maharashtra crackers in the shop) कपाटाच्या ड्रॉवरमधील (closet drawer) कापडी पिशवीत (cloth bag) ठेवलेले २ लाख ३५ हजार ३०० रुपयांची रोकड (Cash) चोरून (Stolen) नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रचना कॉलनी परिसरातील रचना कॉलनीमध्ये शब्बीर इलियास अमरेलीवाला यांचे पोलनपेठ येथील बोहरा मशिदीसमोर महाराष्ट्र फटाका नावाचे दुकान आहे. बुधवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री ये नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले.

मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकान फोडून दुकानात असलेल्या कपाटाच्या ड्रॉवर मधून कापडे पिशवीतील महत्त्वाचे कागदपत्र व २ लाख ३५ हजार ३०० रुपयांची रोकड लांबवल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ मालकाला घटनेची माहिती दिली. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता त्यांना दुकानातील ड्रॉवरचे लॉक तोडून चोरट्यानी रोकड लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले.

व्यावसायिकाला देण्यासाठी ठेवली होती रोकड

चोरीला गेलेली पैसे हे एका व्यावसायिकाला देण्यासाठी ठेवलेले होते. परंतु चोरट्यानी त्या रकमेवरच डल्ला मारला. अखेर अमरेलीवला यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com