तीन लाखांचे चोरट्यांनी केले मोबाईल लंपास

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ; फैजपूर येथील घटना 
तीन लाखांचे चोरट्यांनी केले मोबाईल लंपास

फैजपूर Faizpur ( प्रतिनिधी ) - 

दुकान मालकाने त्याचे दुकानासमोर मोटरसायकल उभी करून मोटरसायकल वरील पिशवी दुकानाच्या ओट्यावर ठेवली एका चोरट्याने सांगितले की तुमचे पैसे पडले आहे. दुकानदार पडलेल्या पैशांसमोर गेला तेव्हा एका चोरट्याने ओट्यावर ठेवलेली तीन लाखांचे मोबाईलची पिशवी लंपास केल्याची घटना दि. २२ मार्च २०२३ रोजी सकाळी दहा ते पंधरा वाजेच्या सुमारास सुभाष चौकातील महेश जनरल स्टोअर अँड मोबाईल रिपेरिंग या दुकानाजवळ घडली.

सदरचे चोरटे हे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कैद झाले. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. वृत्त असे की फैजपूर येथील सुभाष चौकातील महेश जनरल स्टोअर अँड मोबाईल रिपेरिंग या मोबाईल रिपेरिंग दुकानाच्या समोर दि. २२ मार्च २०२३ रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी दुकान मालक किशन चंद अठवाणी हे मोटर सायकल ला मोबाईलची पिशवी लावून आले सदर पिशवीत रिपेरिंग चे सुमारे ९० स्मार्टफोन होते.

सदर मोबाईलची किंमत सुमारे तीन लाखांचे आसपास असल्याचे सांगण्यात आले. दुकानदाराने मोबाईलची पिशवी लावलेली मोटरसायकल दुकानासमोर लावून मोटर सायकलवर लावलेली मोबाईलची पिशवी दुकानाच्या ओट्यावर ठेवली तेवढ्यात एका 28 ते 30 वयोगटातील चोरट्याने सांगितले की रस्त्यावर तुमचे पैसे पडले आहे.

दुकान मालक किशन अठवाणी याने मागून फिरून पाहताच त्या चोरट्याने सिनेमा  स्टाईल सारखी पिशवी लांबून दुसऱ्या चोरट्याच्या हातात दिली सदर चोरटे लागलीच काही अंतरावर ठेवलेली त्यांच्या मोटरसायकल वरून प्रसार झाले. याबाबत मोबाईल दुकानाचे मालक किशन आठवणी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याचे नोंद सुरू होती. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com