निमखेडी शिवारात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला ७२ हजारांचा ऐवज

तालुका पोलीसात गुन्हा दाखल
निमखेडी शिवारात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला ७२ हजारांचा ऐवज

जळगाव - jalgaon

निमखेडी शिवारात बंद घर फोडून सोन्याने दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकुण ७२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे.

प्रतिक दिलीप कुमार गार्तीया (वय-३६) रा. टिळक नगर, निमखेडी शिवार जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान ते घराला कुलूप लावून गावाला गेले होते. चोरट्यांनी जिन्याचा बंद दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकुण ७२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता प्रतिक गार्तीय हे घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. प्रतिक गार्तीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com