हिरागौरी पार्क अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला

हिरागौरी पार्क अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील निमखेडी शिवार (Nimkhedi Shivar) परिसरातील हिरागौरी पार्क अपार्टमेंटमधील (Hiragori Park Apartment) बंद घर फोडून (Breaking locked house) अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास (Jewelery Lampas) केल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल (Crime against unknown thieves) करण्यात आला आहे.

निमखेडी शिवार परिसरातील हिरागौरी पार्कमधील रहिवासी गोविंदा हिलाल पाटील (वय 41) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. विमा प्रतिनिधी म्हणून ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान त्यांनी घर बंद करून बाहेर गेलेले होते.

त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करीत 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास करुन पोबारा केला. गोविंदा पाटील हे रात्री 8 वाजता घरी आले असता, त्यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. गोविंदा पाटील यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेतली.

त्यांच्या तक्रारीवरुन दि. 14 रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीचे गस्ती पथक केवळ नावालाच

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या भागात रात्रीच्या वेळी शहरात पोलिसांचे फिरते गस्ती पथक असून या पथकाला गुंगारा देत मध्यरात्री चोरटे चोरी करण्यात यशस्वी होऊन बंद घरांवर डल्ला मारत आहे. त्यामुळे चोरीच्या घटना दिवसागणिक वाढतच आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com