मुंबईतील पावसामुळे या रेल्वे गाड्या रद्द

मुंबईतील पावसामुळे या रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal - मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासने ९ रेल्वे गाड्या १८ रोजी रद्द करण्यात आल्या आहे. या गाड्या १९ रोजी भुसावळ विभागातून धावणार होत्या.

भुसावळ विभागातून धावणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या त्यात ०२१८८ मुंबई जबलपुर गरिब रथ विशेष, ०२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष, ०२१६९ मुंबई नागपूर विशेष, ०११४१ मुंबई आदिलाबाद विशेष, ०२१०५ मुंबई गोंदिया विशेष, ०२१०९ मुंबई मनमाड विशेष, ०७०५७ मुंबई सिकंदराबाद विशेष, ०२१११ मुंबई अमरावती विशेष, ०७६१२ मुंबई नांदेड राज्यराणी विशेष या ९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.