म्हणून रावेर पोलिसांनी भाजपासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांविरोधात दाखल केले गुन्हे

रावेर पोलिसांची कारवाई : मंत्री मलिक व आ. फडणवीस यांचे पुतळे दहन प्रकरण
म्हणून रावेर पोलिसांनी भाजपासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांविरोधात दाखल केले गुन्हे

रावेर raver|प्रतिनिधी-

येथे भाजप युवा मोर्च्याच्यावतीने (BJP Youth Front) मंत्री नबाब मलिक (Minister Nawab Malik) यांचा तर राष्ट्रवादीकडून (NCP) विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या पुतळ्याचे दहन (Burning of the statue) करण्यात आले होते. या दोन्ही घटनांची रावेर पोलिसांनी (Raver police) दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश (Curfew orders) झुगारून व साथरोग नियंत्रणकामी उपाय योजना न पाळल्याने (Not complying) भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी (Incumbent)यांच्यावर गुन्हे दाखल (Crime filed) करण्यात आले आहे.

यात भाजप पदाधिकारी यांच्या विरुद्ध सहा.फौजदार राजेंद्र करोडपती यांच्या फिर्यादीवरून युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,माजी सभापती जितेंद्र पाटील,युवक तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील,सिंगत सरपंच प्रमोद पाटील,बाळा आमोदकर,नितीन पाटील(पुरी),भूषण पाटील(वाघाडी),सचिन पाटील रा. संभाजीनगर,रावेर,विजय पाटील(अजनाड ) यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी विरुद्ध पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील(चोरवड),युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील(वाघाडी),तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी(खिरवड),शेख मेहमूद शहराध्यक्ष रावेर,कुणाल महाले(रावेर),यांच्यासह १० जणांवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com