पाण्यासाठीच जगात तिसरे महायुध्द होणार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह यांचा इशारा
पाण्यासाठीच जगात तिसरे महायुध्द होणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जगातच्या 120 देशांमध्ये यात्रा केली. ज्या देशात पाण्याची समस्या (Water problem) आहे त्या देशातील लोक पाणी असलेल्या देशात स्थलांतरित होत आहे . त्यामुळेच पाण्यावरुनच तिसरे महायुध्द (third world war for water) होणार आहे. आणि त्या युध्दासाठी युरोपीय देशांमध्ये (Preparations in European countries) तयारी झाली असुन ते सुरु झाल्याचा खळबळजनक दावा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह (Ramon Magsaysay Award winner Rajendra Singh) यांनी केला.

कानळदा येथे गिरणा जलपरिक्रमेच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलतांना राजेंद्रसिह म्हणाले की, नदीला जोडण्याचे नव्हे तर नदीबरोबरच जुडण्याचे काम आपल्या करावयाचे आहे. आर्थिक लोभापायी नद्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे. असे म्हणत राजेंद्र सिंह यांनी वाळुचोरीच्या मुद्यावरुन शासन प्रशासनावर टीका केली.

नदी जोड प्रकल्प वादग्रस्त

नद्या जोड प्रकल्पालाही विरोध असुन हे देवाचे काम निसर्ग देवतेलाच ते करु द्या , कावेरी नदीचा वाद अजुन सुरु आहे, सतलज - जमुना जोडचा वाद सुरु आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्पामुळे आणखी नवीन वाद उभे राहतील, कंपन्यांच्या घशात मोठ्या प्रमाणावर पैसा जाईल, पैशांची नासाडी तर होईलच पण पाणीही मिळणार नाही नद्याचे नैसर्गिक दृष्ट्या वैभव कायम राहण्यासाठी आता पासुन प्रयत्न व्हावेत नद्या जीवंत राहिली तर आपण जीवंत राहु असेही ते म्हणाले.

गिरणेला जीवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच

गिरणेची परिक्रमा केल्यानंतर जलपुरूष राजेंद्र सिंह यांची नियोजन भवनात बैठक झाली. यावेळी राजेंद्र सिंह मनोगतात बोलतांना म्हणाले की, गिरणेची तीन प्रकारची जमीन आहेत. त्याचप्रमाणे गिरणेची परिक्रमा केली असता असे लक्षात येते की, गिरणा नदीवर तीन मोठे संकट कोसळले आहे. यात अतिक्रमण, मोठ्या प्रमाणावर कंपन्याचे सांडपाणी त्यामुळे होणारे प्रदुषण व मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपासा या तीन संकटांमुळे गिरणा नदीचे शोषण होत असून ती मरणासन्न अवस्थेत पोहचली आहे. गिरणा नदी अतिदक्षता विभागात असून तिला जीवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे राजेंद्रसिंह म्हणाले. रिचार्ज कमी आणि डिच्चार्ज जास्त याप्रमाणे जमीनीतील गिरणेतील पाण्याची गंभीर स्थिती आहे. नदीला जीवंत ठेवण्यासाठी पाच गोष्टींवर काम करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यात जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये, तसेच गावांमध्ये नदीसाक्षरतेबाबत जनजागृती करावी, गिरणा नदीवर लहान सर्व झरे शोधून, त्यावर काम करुन ते प्रवाहीत करणे, पर्यावरणाचा अभ्यास करणार्‍यांचा समूह तयार करणे व त्यांच्या माध्यमातून अभ्यास करणे, हवामानाचा अंदाज घेणारे अभ्यासक तज्ञ शोधून त्यावर आधारीत पीक लागवड पध्दतीची अंमलबजावणी करणे या पाच गोष्टींवर करा. म्हणजे आपण लहानपणी ज्या पध्दतीने नदी बघायचो, तशीच नदी आपल्या मुलांना पुढच्या पिढीला पहायला मिळेल असे सांगत नीर नारी नारायण याप्रमाणे नदीचाही सन्मान करा, आपण तिचा आता सन्मान केला तर ती भविष्यात आपल्या पिढीचा उद्धार करेन असे यावेळी राजेंद्रसिंग यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com