नागेश्वर मंदिराजवळ उड्डाणपूल होणार

नागेश्वर मंदिराजवळ उड्डाणपूल होणार

रेल्वे अधिकार्‍यांकडून जागेची पाहणी : तालुक्यासह बोदवड, जामनेर मार्ग होणार सुखकर

वरणगाव फॅक्टरी, Varangaon factory ता. भुसावळ । प्रतिनिधी

अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या वरणगाव बोदवड (Varangaon Bodwad) रस्त्यावर नागेश्वर मंदिराजवळ (Nageshwar Temple) रेल्वे उड्डाणपुलाला (railway flyover) मंजुरी (Approval) मिळाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगावहुन बोदवडकडे जाणार्‍या रस्त्यावर नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या या रेल्वे पुलाखालून मोठी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच दोन्ही बाजूंनी चढाव असल्याने प्रत्येक पावसाळ्यामध्ये या पुलाखाली भरपूर पाणी साचत असते. त्यामुळे वाहन चालवणे जिकरीचे होते. सदर पुलावर उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदन पाठवून पाठपुरावा केला आहे.

तसेच वेळोवेळी खा. रक्षा खडसे यांनासुद्धा भेटून हा उड्डाणपूल किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले होते. या अनुषंगानेच रेल्वे मंत्रालयाकडून हा उड्डाणपूल मंजूर झाला असून रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी जागेची नुकतीच पाहणी सुध्दा करून गेले.

वरणगांव - बोदवड हा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून या रस्त्यावर सुसरी, पिंपळगाव, गोळेगाव, आचेगाव, साळशिंगी, बोदवड, भानखेडा ही गावे आहेत. भानखेड्याजवळ शिंदी, नाशिराबाद मार्ग व पुढे बोदवड, जामनेर मार्ग या रस्त्याला जोडले जातात यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.

हा रस्ता महत्त्वाचा मार्ग समजला जातो तसेच नागेश्वर मंदिराजवळ याच रस्त्याला वेल्हाळे रस्ता जोडला गेला आहे. तरी सदर मार्ग उड्डाण पुलाने जोडला गेले असून वाहतूक सुरळीत होईल.

त्याचप्रमाणे सिद्धेश्वर नगर जवळील पुलाखाली सुद्धा पाणी साचत असून या मार्गाचे ही योग्य पद्धतीने रेल्वे प्रशासनाने नियोजन केल्यास वरणगावचा काही भाग सिद्धेश्वर व कॉलेज परिसर कायमस्वरूपी गावाशी जोडला जाईल यामुळे हा मार्ग सुकर होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com