
रावेर|प्रतिनिधी- Raver
भाटखेडा (ता.रावेर) येथील ग्रा.प.उपसरपंचपदी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत जयश्री महाजन यांचा विजय झाला आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी निर्धारित वेळेत जयश्री महाजन यांच्या विरोधात रशीद तडवी यांनी अर्ज भरला होता.यासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत उपस्थित सदस्यांनी हात वर करून मतदान करत कौल दिला.
यात जयश्री महाजन यांच्याबाजूने सरपंच सुनिता पाटील,स्वत: उमेदवार जयश्री महाजन, सदस्य योगेश पाटील, कामिनी पाटील, मालताबाई ठाकरे यांनी कौल दिला. तर प्रतिस्पर्धी रशीद तडवी यांच्याबाजूने त्यांनी स्वत; व काशिनाथ ठाकरे,मंदाबाई पाचपोळ,राहुल हिवरे, मीनाबाई तडवी यांनी मतदान केले.
यात दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने,सरपंच यांनी निर्णायक मत नोंदवत जयश्री महाजन यांच्या बाजूने कौल दिल्याने,या निवडणुकीत जयश्री महाजन यांना उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे.अटीतटीच्या निवडणुकीत सौ महाजन विजयी झाल्याने समर्थकांनी जल्लोष केला.यावेळी ग्रामसेवक व्ही आर चौधरी यांनी निवड प्रक्रीयेसाठी सहकार्य केले.