रावेर|प्रतिनिधी raver
धामोडी (ता.रावेर)येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत वर्ग चार व प्रतिनियुक्तीवर एक शिक्षक असल्याने,संतप्त पालकांनी थेट पंचायत समितीत विद्यार्थ्यांसह मोर्चा आणून शिक्षक मिळावी अशी मागणी केली.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक देता का शिक्षक अशी घोषणा करून पंचायत समितीचा आवार दणाणून सोडला.
या आंदोलनाची पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र फेगडे व गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी तातडीने दखल घेत दुसऱ्या शाळेतून एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती या ठिकाणी करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे .यावेळी पालकांसोबत अटवाडे माजी सरपंच गणेश महाजन उपस्थित होते.