नवरात्रतही देवीच्या दर्शनासाठी पाण्यातून यात्रा का?

पाटणादेवीच्या दर्शनासाठी अद्याप नदीवर पूल नाहीच, आमदारांनी पुलासाठी केली होती २५ लाखांची घोषणा
नवरात्रतही देवीच्या दर्शनासाठी पाण्यातून यात्रा का?

मनोहर कांडेकर

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्याचे वैभव म्हणजे आदिशक्ती पाटणा (Patna Devi) निवासिनी चण्डिकादेवी मंदिर (Chandikadevi Temple) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतू गेल्या दोन महिन्यांपासून येथे पुल नसल्यामुळे भाविकाचे देवीच्या दर्शनासाठी हाल होत आहे. तसेच येथील हातावर पोट भरणार्‍या व्यवसायीक देखील आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दि,२६ पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. अद्यापही नदीवर लोखंडी पुल उभारण्यात आला नाही. पुल उभारणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी २५ लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र नवरात्र उत्सव तोडावर असतानाही पुलाचा प्रश्‍न मार्गी न लागल्यामुळे नवरात्रीतही देवीच्या दर्शनासाठी भाविकांना पाण्यातून पाटपीट करत यात्रा करावी लागणार का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी तातडीने पुलाची उभारणीसाठी जातीने लक्ष घालवे अशी मागणी होत आहे.

गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून चाळीसगाव तालुक्यासह पाटणादेवी अभयारण्य परिसरात मुसळधार पावसाच्या आगमनाने पाटणादेवी परिसरातून वाहणारे धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे. अशातच गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वीच पाटणादेवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मुख्य मार्ग नदीवरील लोखंडी पुल पुरातत्वविभागाच्या गलथांबपणामुळे ठेकेदाराने पैसे न मिळाल्याने काढुन नेला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भाविक आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून पायपीट करत, देवीचे दर्शन घेत आहे. आता दि,२६ पासून नवरात्रउत्सावाला प्रारंभ होत आहे.

नवरात्रीत महाराष्ट्रासह परराज्यातून देवीच्या दर्शनसाठी हाजारो भाविक येतात. तर यात्रेमुळे येथे नऊ दिवसात लहान-मोठ्या व्यवसायीकांचा चांगल्याप्रकारे व्यवसाय होवून, त्यांच्या हाताला दोन पैसे मिळतात. गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे यात्रा उत्सवावर बंदी होती. त्यामुळे व्यवसायीक प्रचंड अडचणीत आहेत. आशातच नवरात्र उत्सव तोंडावर असतानाही नदीवर पुलाची उभारणी करण्यात आली नाही. पुरातत्व विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भाविकांचेे म्हणने आहे.

तर आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसी पाटणादेवीचे दर्शनावेळी डोंगरी नदीवरील लोखंडी पूल उभारणीसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये खर्चातून सदर जागेवर लोखंडी पूल उभारण्यात येईल अशी घोषणा केली होती. यासाठी सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतर तात्काळ याठिकाणी लोखंडी व मजबूत असा पूल उभा राहिल असे सांगण्यात येत होेते. परंतू अजुनही पुलाच्या निर्मितीसाठी कुठल्याही प्रकारच्या हालचाली होतांना दिसून येत नाही. त्यामुळे यंदा भाविकांना पाण्यातूनच पायपीट करत, देवीच्या दर्शन घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने लक्ष घालून नवरात्र उत्सावापूर्वीच पुलाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com