टोलनाका पावत्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई नाहीच

अखेर पोलिसच झाले फिर्यादी : जनरल मॅनेजरसह सात जणांविरूध्द गुन्हा
टोलनाका पावत्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई नाहीच

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील (Jalgaon-Bhusawal National Highway) नशिराबाद टोलनाक्यावर (Nashirabad toll booth) बोगस पावत्या (Bogus receipts) देऊन वाहनधारकांची (vehicle owners) आर्थिक लूट (financial loot) होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात टोलनाक्यावरून दोन हॅन्डमशिन नशिराबाद पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी नही या विभागाने पोलिसात फिर्याद देण्यास टाळाटाळ केली होती. नहीचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा (Chandrakant Sinha, Project Director of Nhai) यांनी फिर्याद देणे अपेक्षित असतांना केवळ दंडाचे कागदी घोडे नाचविण्यात आले होते. अखेर 20 दिवसांनंतर या प्रकरणात पोलिसांनीच स्वत: (police themselves) फिर्यादी (prosecutors) होऊन गुन्हा (crime) दाखल केला. यात टोलनाक्यावरील जनरल मॅनेजर, अकाऊंटंटसह सात जणांविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरसोद ते चिखली या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर नशिराबादनजीक नव्याने टोल नाका सुरू झाला आहे. या टोल नाक्यावर बोगस पावत्यांद्वारे टोल वसुली होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दि. 21 जुलै रोजी रात्री या टोल नाक्यावर धाड टाकली होती.

या कारवाईत टोल पावतीचे दोन बोगस हँड मशीन व 210 रुपये जप्त करण्यात आले होते. कारवाईचा पंचनामा व अहवाल नशिराबाद पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला होता. या झोलच्या संदर्भात पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात न्हाईला देखील अहवाल देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद द्यावी म्हणून सांगितले होते. परंतु न्हाईकडून सुरुवातीपासूनच या फिर्याद देण्याबाबत टाळाटाळ केली जात होती.

टोलनाक्याची मुदत वाढविण्यासाठी केला प्रकार

ठेकेदार, जनरल मॅनेजर व इतर जणांनी कट रचून न्हाई च्या सर्वरशी न जोडलेल्या मशीनद्वारे अवैध वसुली केल्याचे उघड झाले. तसेच शासनाला कमी पैसा येत असल्याचे दाखवून टोलनाक्याची मुदत वाढावी यासाठी हा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.

नहीचे सिन्हा ठरताय मौनीबाबा नशिराबाद टोलनाक्यावर उघड झालेल्या प्रकारासंदर्भात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात नही या विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांची भूमिका ही संशयास्पद वाटत होती. या प्रकरणात नही विभागाने अहवाल मागविला होता. प्राप्त अहवालानुसार सिन्हा यांनी फिर्याद देणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराच्या बचावासाठी आत्तापर्यंत फिर्याद देण्यात आली नव्हती अशी चर्चा आहे. अखेर पोलिसांनीच या प्रकरणात फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केल्याने नहीचे चंद्रकांत सिन्हा मौनीबाबाच ठरल्याचे दिसून येत आहे.

शासन, जनतेची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल

टोल नाक्यावरील जनरल मॅनेजर सेहवाल समशेर खान, अकाऊंटंट शिवदत्त पारिख, संतोष तिवारी, प्रदीप यादव, सिताराम यादव, शमीम खान व सवाईसिंग या सात जणांनी यात शासन व जनता या दोघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी स्वत:च फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com