...तर शिक्षकांवर येणार गंडांतर

पुणे शिक्षण संचालकांच्या आदेशाने उडाली भंबेरी
जळगाव जि.प
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात सन 2015 ते 2019 या चार वर्षांच्या कार्यकाळात बोगस शिक्षकांच्या (Bogus teachers) मान्य व शालार्थ आयडी (School ID) प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे शिक्षण संचालक (Director of Education) महेश पालकर (Mahesh Palkar) यांच्यासह त्यांच्या पथकाकडून जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमिक शिक्षण विभागात बोगस मान्यतांची चौकशी केली होती. मात्र, गहाळ फाईलींची (Missing files) माहिती दडविली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता पुणे शिक्षण संचालकांनी जिल्हाभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या (Schools) मुख्याध्यापकांकडून (Headmaster) चार वर्षांच्या कार्यकाळातील मान्यता घेण्यात आलेल्या शिक्षकांची माहिती (Information) मागविण्यात आली आहे. तसेच सदर माहिती सादर न करणार्‍या शाळांचे पगार (Salary) थांबविण्याचा स्पष्ट इशारा पुणे शिक्षण संचालकांनी दिला आहे.

सन 2015 ते 2019 या कार्यकाळात जळगाव jalgaon जिल्ह्यात 750 मान्यता देण्यात आल्या असून अनेक शिक्षकांचे शालार्थ आयडी (School ID) देखील नाशिक शिक्षण उपसंचालकांकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाकडून (Directorate of Education) या प्रकरणाची शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यातच पुणे शिक्षण संचालक महेश पारकर यांच्यासह त्यांच्या पथकाकडून जळगाव जि.प. (Zilla Parishad)माध्यमिक शिक्षण विभागात झाडाझडती करीत बोगस मान्यतांची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान 262 मान्यतांच्या फाईली (files) सापडल्या आहेत. मात्र, उर्वरित 488 फाईली सापडल्या नसल्याची बाब समोर आली असून या घटनेला पुणे शिक्षण संचालकांनी देखील दुजोरा दिला होता.

जिल्ह्यातील खासगी अनुदानीत,अंशता अनुदानीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्यध्यापकांना (Headmaster) पत्र पाठवून 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीतील कर्मचार्‍यांच्या अनुदानीत वैयक्तिक मान्यता, विना अनुदानीत पदावरून अनुदानीत पदावर बदली मान्यता असल्यास विना अनुदानीत वैयक्तिक मान्यतांसह बदली मान्यता आदेशाच्या प्रती व वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या आदेशाच्या सर्व साक्षांकित प्रती 4 सेटमध्ये शाळेच्या लेटरपॅडसह उपलब्ध करून देण्याचे आदेश पुणे शिक्षण संचालकांनी दिले आहे.

शिक्षण संचालकांकडून (Director of Education) या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने मुख्यध्यापकांना पत्र पाठवून माहिती दि.18 फेब्रवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान चार वर्षात मिळालेल्या मान्यता व शालार्थ आयडी यांची माहिती न देणार्‍या शाळांचे पगार (Salary) थांबविण्याचे पत्र देखील जारी करण्यात आले आहे. पडताळणीसाठी वेतन पथकाकडून देखील चार वर्षात शालार्थ आयडी देण्यात आलेल्या शिक्षकांची व या काळात पगार सुरू झालेल्या शिक्षकांची (teachers) माहिती काढण्याचे काम सुरू झाले आहे.त्यामुळे बोगस मान्यता घेणार्‍या शिक्षकांची धाकधुक वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com