...तर देशात समता व बंधुता नांदेल : डॉ.अशोक राणा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव
 ...तर देशात समता व बंधुता नांदेल : डॉ.अशोक राणा

जळगाव jalgaon प्रतिनिधी

विविध पुरोगामी चळवळीतील (progressive movement) कार्यकर्त्यांनी (activists) एकमेकांप्रती सहकार्याची भावना (sense of cooperation) ठेवल्यास चळवळींना यश येऊन देशात समता व बंधुता नांदेल (Equality and brotherhood) व महापुरुषांना अपेक्षित असलेला देश निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिध्द विचारवंत डॉ.अशोक राणा (Thinker Dr. Ashok Rana) यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले(Mahatma Phule) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती महोत्सव (Jayanti Festival) साजरा करण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या चौथ्या दिवशी गुरुवार दि.१४ रोजी “पुरोगामी चळवळीच्या दृष्टिकोनातून विकसनशील भारत” ("Developing India from the Perspective of Progressive Movement") या विषयावर डॉ. अशोक राणा (Thinker Dr. Ashok Rana) यांनी सिनेट सभागृहात आपले विचार मांडले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी (Vice Chancellor Prof. VL Maheshwari), पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे , प्रा.म.सु.पगारे, प्रा. अनिल डोंगरे यांची उपस्थिती होती.

डॉ. राणा पुढे म्हणाले की, भारतात पुरोगामी चळवळी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. चळवळी (movement) या कायर्कर्त्यांच्या बळावर चालत असतात. त्यामुळे चळवळीत अनुयायी होत असतांना नेत्यांच्या जातीचा (caste of leaders) नव्हे तर पुरोगामी विचार (Progressive thinking) लक्षात घेतले गेले पाहिजे. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी आधुनिक विचार मांडतांना तो समाजात रुजविण्यासाठी हळुवारपणा ठेवला. तेा संयम चळवळीत काम करणाऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. महापुरुषांना जाती पाती मध्ये न अडकवून ठेवता त्यांच्या आधुनिक व विज्ञाननिष्ठ विचारांची (Scientific thinking) प्रेरणा समाजाने स्वीकारली पाहिजे. डॉ. राणा यांनी अनेक चळवळींचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी म्हणाले की, महापुरुषांना (great men) भारत सशक्त राष्ट्र (India is a strong nation) व्हावे अशी अपेक्षा होती. जगात तरुणांची संख्या जास्त असलेला भारत हा देश आहे. तरुणांनी (youth) बुध्दी-चातुर्य, प्रतिभा व श्रमसंस्कृती (Labor culture) हे गुण अंगीकारल्यास भारत हे सशक्त राष्ट्र होऊ शकते. भेदभाव, मतभेद या गोष्टी बाजुला सारुन दृष्टीकोण बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीस पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे (Superintendent of Police Dr. Praveen Munde) यांनी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज निर्माण होण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी तरुणांनी घ्यावी. तरुणांनी (youth) शिक्षण घेऊन न्याय, समता व बंधुता (Justice, equality and brotherhood) हे तत्व आचरणात आणावे व महापुरुषांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.दीपक खरात यांनी केले. प्रा. म.सु. पगारे यांनी महात्मा फुले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यशस्वीतेबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानले. या व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

जल्लोषात मिरवणूक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्‍त विद्यापीठात सकाळी प्रचंड जल्लोषात मिरवणूक (Procession) काढण्यात आली. प्रशासकीय इमारतीजवळ या मिरवणूकीचा समारोप झाला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.दीपक दलाल, एस.आर.गोहिल, प्रा.राकेश रामटेके, प्रा. किशोर पवार, प्रा.रमेश सरदार, अजमल जाधव, राजू सोनवणे, मनोज वराडे, जगदीश सुरळकर, संजय सपकाळे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, भैय्या पाटील, दुर्योधन साळुंखे, अमृत दाभाडे, वैशाली वराडे, अशेाक पाटील, वसंत वळवी आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com