बांबरूड येथे उभ्या ट्रकच्या चाकांची केली चोरी

बांबरूड येथे उभ्या ट्रकच्या चाकांची केली चोरी

पाचोरा Pachora प्रतिनीधी

बांबरूड (Bambarud) येथिल दुकानासमोर (shop) उभ्या असलेल्या (parked trucks) ट्रकचे ५० हजार रूपये किंमतीचे  मागिल चार चाक (four wheel) अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) चक्क चोरून (stealth) नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की,पाचोरा शहरातील भडगाव रोड भागात राहणारे शशिकांत पाटील याचे बांबरूड येथे सुदर्शन सिमेंट प्रोडक्ट पेव्हर ब्लाॅकचे दुकानाच्या गेटजवळ त्यांचा चुलत भाउ प्रमोद सोनवणे याचे १०१३ टरबो ट्रक क्रमांक एम.एच.०४ डी.एस.०५५१ हे वाहन चालक महेश पटेल याने ३ नोहेंबर उभी केले होते.

बांबरूड येथे उभ्या ट्रकच्या चाकांची केली चोरी
दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

शशिकांत पाटील हे संध्याकाळी घरी जातांना गाडी व गाडीचे टायर होते. माञ राञी ८ वाजेच्या सुमारास तेथिल कर्मचारी कृष्णा वसावा याचा फोन आला की ट्रकचे मागिल चार चाक कुण्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन घेउन गेले आहेत.

दरम्यान शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून परिसरात तपास केला पण टायर आढळुन आले नाहीत. त्यामुळे शशिकांत पाटील यांनी ५० हजार रूपये किंमतीच्या चार टायरांच्या चोरीबाबत पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला असुन तपास पोलिस नाईक अशोक हटकर हे करत आहेत.

बांबरूड येथे उभ्या ट्रकच्या चाकांची केली चोरी
तुरीच्या शेतात 62 लाखाच्या गांजाची लागवड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com