चाळीसगावात अडीच लाखांची चोरी

चाळीसगावात अडीच लाखांची चोरी

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

शहरातील कोदगाव रस्त्यावरील (Kodgaon road) शेतात (farm) असलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) सालदार आणि बैलांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करणार्‍या इसमाच्या घरातून बैलाच्या खरेदी विक्रीतील दोन लाख दहा हजार रुपयांच्या (amount of Rs) रकमेसह कपाटातील सोन्याच्या वस्तू (Gold items) असा एकूण दोन लाख ४४ हजाराच्या मुद्देमालासह शेतीची अवजारे (Agricultural implements) देखील चोरून (stealth) नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

कोदगाव रस्त्यावरील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या मालकीच्या शेतात महादू सखाराम अहिरे हे शेती काम करतात त्यासोबतच ते बैलांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात, दिनांक २५ रोजी बैलांच्या विक्रीतून आलेले दोन लाख दहा हजार रुपये त्यांनी दोन वेगवेगळ्या पँटीच्या खिशात ठेवून सुरक्षितपणे ठेवले होते.

रात्री त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतातील घराबाहेर झोपल्यानंतर घराला कुलूप लावलेले नव्हते याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात संधी साधली सकाळी त्यांचा मुलगा पाच वाजता उठून घरात गेला, तेव्हा घरातील सामान असता व्यस्त पडले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने वडिलांना उठवले असता पैसे ठेवलेल्या पॅन्ट आढळून आल्या नाहीत आणि कपाटातील सोन्याचे दागिने ही नसल्याने घरात चोरी झाल्याचे आणि काही शेती उपयोगी अवजारांची ही चोरी झाली.

या प्रकरणी महादू अहिरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com