महावितरणच्या डिपीतून ऑईलची चोरी

शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
चोरी
चोरी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
तालुक्यातील बिलाखेड गावातील (MSEDCL) महावितरण कंपनीच्या डीपीतून अज्ञात चोरट्यने, ४५ हजार रुपये किमतीच्या (Oil) ऑईलची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर (police) पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बिलाखेड गावातील ११ केवी शेती पंपाचा वीजपुरवठा अचानक बंद पडला. स्थानिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून वीजपुरवठा खंडित असल्याबाबत सांगितले. महेंद्र कैलास पाटील यांच्या तक्रारींवरून महावितरण कंपनीचे कर्मचारी सोमवार, २० रोजी सदर गावात गेले. त्यावेळी रोहित्रातील ४५ हजार रुपये किमतीचा एकूण ४५६ लिटर ऑइल अज्ञाताने चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी सहायक अभियंता संजय मोहन सरताळे (वय-४५) रा. फुले कॉलनी, चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com