सिंदखेडे येथे बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

सुमारे ४० हजाराचा ऐवज लंपास
सिंदखेडे येथे बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

रावेर|प्रतिनिधी raver

सिंदखेडे (ता.रावेर) येथे शुक्रवारी रात्री बंद घरात चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलिसात पंकज महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चोरी झालेल्या कुटुंबातील सर्व जण नातेवाईकांकडे हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते,शुक्रवारी रात्री परत आले तेव्हा लोखंडी गेटचा कोंडा तोडून घरातील सामानाची फेकाफेक झाल्याची दिसून आली. यावेळी लोखंडी पेटीत असलेले २० हजार रोख व ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ४० हजाराचा ऐवज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.याबाबत रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com