किराणा दुकानातून काजू, बदामासह ४३ हजारांचा मुद्देमाल लपास

चोरटा सिसिटिव्हीत कैद
चोरी
चोरी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील बस स्थानकामागील (Lucky Complex) लकी कॉम्प्लेक्समधील किराणा दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून रोेकडसह बदाम आणि काजू असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच याच संकुलातील सलूनमधील १ हजार रुपयेही लंपास केले. तर अन्य दोन दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

दीपक अशोक पाखले यांचे बस स्थानकामागील लकी कॉम्प्लेक्समध्ये सद्गुरू किराणा दुकान आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता दुकान बंद करून पाखले घरी गेले. दुकानात दिवसभर किराणा माल विक्रीची आलेली ३९ हजार रुपयांची रोकड त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवली होती. २१ रोजी सकाळी ९.३० वाजता पाखले हे नेहमीप्रमाणे किराणा दुकान उघडण्यासाठी आले असता किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या व शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत दिसले. यात चोरट्याने ४१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरल्याचे आढळले. या प्रकरणी दीपक पाखले यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत (police) गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्याने मेन्स पार्लरच्या दुकानातही प्रवेश करून १ हजाराची रोकड लांबवल्याचे समजते. तर शेजारच्या दोन किराणा दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती पाखले यांनी दिली. यातील चोरटा सिसिटिव्हीत कैद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता पोलीस (CCTV footage) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com